साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली तर्फे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साई सेवक श्री.मोहन ज.कदम यांचा गौरव !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या साई परिवार सेवाभावी ट्रस्टला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साई सेवक श्री. मोहन जयराम कदम यांनी म्हाडा मार्केट, सेक्टर -२, प्रधानमंत्री जन औषधी मेडिकल समोर, चारकोप, कांदिवली (प.) मुंबई -४०० ०६७ येथे सदिच्छा भेट देऊन ट्रस्ट चे कामकाज आणि कार्य जाणून घेतले.
सविस्तर चर्चा झाल्यावर साई परिवारचे सर्वश्री मंगेश अंकुश रासम, सौ.मनीषा रासम, अनिल वडके याच्यातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर पासून जवळ असलेल्या मु.पो. कासार कोळवण गावचे सुपुत्र, महाराष्ट्र मधील अनेक सामाजिक संस्था, मंडळ, प्रतिष्ठाण, ग्राम मंडळ, समाज मंडळचे पदाधिकारी, सदस्य, सभासद असलेले मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहन ज. कदम व त्यांची पत्नी सौ. मनीषा मो. कदम यांचा सत्कार करण्यात आला. साई परिवार तर्फे आदिवासी भागात अन्नदान, कर्णबधिर शाळा, अपंग शाळा यांना अन्नदान व भेट वस्तू भेट देणे. आदिवासी भागात किराणा वाटप, कोविड काळात अन्नदान, मास्क वाटप तसेच रुग्ण उपयोगी साधने पुरविण्यात येतात असे कामकाज करतात. रुग्ण साठी आवश्यकता असलेली उपयोगी साधने ट्रस्ट तर्फे नि:शुल्क दिली जातात. साधने घेणाऱ्याला साधने घेताना अनामत रक्कम भरावी लागेत. मात्र साधन परत करते वेळी ती अनामत रक्कम त्यांना पूर्ण परत केली जाते. ज्यांना आपल्या रुग्णासाठी आवश्यकता असलेले साधन हवे असेल त्यांनी मंगेश रासम- ८९२८२०६९४९ आणि विनायक सावंत - ९९२०४१००९८ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment