Wednesday, 22 November 2023

कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयटक ची संघर्ष यात्रा 28 नोव्हेंबर रोजी चोपड्यात !!

कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयटक ची संघर्ष यात्रा 28 नोव्हेंबर रोजी चोपड्यात !! *तयारीसाठी बैठक*...

चोपडा, प्रतिनिधी... महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस..आयटक ने कोल्हापूर शाहू भूमी ते दीक्षा भूमी अशी जनजागरण यात्रा २० नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. ती २८ ऑक्टोबर रोजी चोपडा तालुक्यात येत आहे. यात्रेत आय टक अध्यक्ष श्री कॉ. सी एन देशमुख, सचिव शाम काळे, आशा नेते कॉ. प्रा राजू देसले, अंगणवाडी अध्यक्ष माधुरी ताई क्षीरसागर. किसान सभा अध्यक्ष कॉ. ॲड. हिरालाल परदेशी आदी २० नेते सहभागी असून त्या यात्रेचे चोपडा तालुक्यातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, आशा सेवानिवृत्त कामगार, शेतमजूर यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी अकरा वाजता.. सभा आयोजित केली आहे. 

या दृष्टीने नियोजन करण्यासाठी चोपडा येथे आयटक संपर्क  कार्यालयात कॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आयटक चे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले.. या बैठकीला सर्वश्री कॉ. भास्कर सुखराम सपकाळे  व प्रकाश सपकाळे तुरखेडा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर कंडारे, यावल शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉ वासुदेव कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य समिती सदस्य कॉ. महेंद्र धनगर, एसटी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे कैलास पाटील, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या तालुकाध्यक्ष कॉ. वत्सला पाटील, ममता महाजन, शांताराम पाटील आदी उपस्थित होते... त्यावेळी यात्रेचे २००० हस्तपत्रके वितरण करण्यात आले आहे. आशा वर्करांना १५०००₹ ची वाढ जाहीर केली, त्यांचा तालूकाव्यापी आनंदी मेळावा, अंगणवाडीच्या ४ डिसेंबर संप.. ग्रामपंचायत कर्मचारी यांचा २८ नोव्हेंबर चा इशारा संप ...शेतकरी, शेत मजूर, आदिवासींचे जमीन नावे करणे दावे निकाली काढणे, शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव.. सेवानिवृत्त कर्मचारी व शेतकरी शेतमजूर यांना किमान ५०००₹ पेन्शन या प्रश्र्नी १८ डिसेंबर नागपूर येथील विधान सभेवर विराट मोर्चा धडकनार आहे. देशातील कामगार विरोधी धोरणे.. भांडवलदार कॉर्पोरेट घराणे त्यात ही अडाणी, अंबानी याना झुकते माफ देणारे.. जाती धर्माचे नावे श्रमिक जनतेत फूट पाडणारे भाजप सरकार २०२४ को चले जाव हा मुख्य नारा ज्या इंडिया आघाडीने दिला, त्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आदी पक्षांचे नेत्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून त्या पक्षांचे जिल्हा नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे असे जनजागरण यात्रा तयारी आयोजन समिती चे जाहीर केलेल्या पत्रकात नमूद केले आहे..

1 comment:

  1. खूपच छान.मस्त कॉ.अमृत महाजन लाल सलाम.आयटक जिंदाबाद.

    ReplyDelete

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...