श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर ( प.) येथे "विच्छा माझी पुरी करा" नाटयप्रयोगाचे आयोजन !!
*प्रदीर्घ दिवसानंतर चंदगडी कलाकरांचा मुंबई रंगभूमीवर झळकणार बहारदार कलाविष्कार*
मुंबई, (शांताराम गुडेकर / दिपक कारकर) :
श्री देव रवळनाथ, मल्लनाथ व सातेरी भावई देवीच्या कृपा आशीर्वादाने कोल्हापूर जिल्ह्यातील, चंदगड तालुक्यातील कलावंत मंडळी मुंबई रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. आजवर ७ ते ८ नाटयप्रयोग यशस्वीरित्या करून लवकरच मुंबई रंगभूमीवर श्री मल्लनाथ क्रिऐशन कानुर खुर्द, ता.चंदगड जि. कोल्हापुर प्रस्तुत, वसंत सबनिस लिखीत "विच्छा माझी पुरी करा" हे दोन अंकी धम्माल विनोदी नाटक श्री.शिवाजी मंदिर, दादर, पश्चिम ( मुंबई ) येथे रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० : ०० वा.सादर होणार आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक दिगंबर दोरुगडे, सागर गावडे आणि अमित कबाडी यांच्या संकल्पनेतून, श्री.गुंडू विष्णू झेंडे,(अविनाश इंटरप्रायझेजेस, संस्थापक मुंबई, धामापूर) यांच्या सहकार्याने, अरुण गावडे, युवराज पाटील - (स्वराज्य जननी जिजामाता फेम), विठ्ठल सुतार (पँडी), संदीप मोरे (सँडी), प्रमाला सांळुखे, जान्हवी पाटील, तेजश्री डसके (मांडेदुर्ग), संघटक दशरथ गुडुळकर, संपर्क प्रमुख बबन गवसेकर, नामदेव पाटील यांच्या सहकार्याने नेमणूक झालेले ह्या नाट्यप्रयोगाचे सूत्रधार अशोक मामा नार्वेकर (जेलुगडे) हे प्रचंड मेहनत घेऊन सदर नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी धडपड करत आहेत. अधिक माहितीसाठी अशोक नार्वेकर - ९७०२७८५५४८/ सागर गावडे - ९१६७०८९४७२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment