Wednesday, 22 November 2023

ग्रुप ग्रामपंचायत मुर्तवडे, वारेली कातळवाडीच्या सरपंच पदी श्रावणी भुवड यांची बिनविरोध निवड !!

ग्रुप ग्रामपंचायत मुर्तवडे, वारेली कातळवाडीच्या सरपंच पदी श्रावणी भुवड यांची बिनविरोध निवड !!

चिपळूण - ( दिपक कारकर )

तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत मुर्तवडे,वारेली कातळवाडीच्या सरपंच पदाचा कालावधी अडीच-अडीच वर्षाचा ठरला होता, दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी स्मिता उदय पवार ह्या सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या, त्यांचा अडीच वर्ष कार्यभार झाल्यावर त्यांनी ११ सप्टेंबर २०२३ रोजी राजीनामा दिला. व प्रभारी सरपंच बबन धाकटू नेवरेकर यांच्याकडे अतिरिक्त्त कारभार सुपूर्द करण्यात आला होता. 

आज मंगळवार दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक अधिकारी मुल्ला साहेब यांनी सरपंच पदाची प्रक्रिया पूर्ण करून श्रावणी सचिन भुवड हिस सरपंच म्हणून अडीच वर्षाकारिता घोषित केले. सदर निवडणूक बिनविरोध होऊन, गेल्या अनेक वर्षाची बिनविरोध परंपरा आजही कायम ठेवली आहे. नवनिर्वाचित सरपंच महोदया श्रावणी सचिन भुवड यांचे ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. ह्यावेळी गावप्रमुख काशीराम दुर्गोळी, वाडीप्रमुख रामचंद्र निवाते, सुनील मांडवकर - ( मधलीवाडी प्रमुख ) व ग्रामविकासाधिकारी हराळे, तलाठी सतीश जाधव, जिल्हा परिषद शिक्षक उदय पवार ( गुरुजी ) तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...