Tuesday, 21 November 2023

रायते विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत डंका, अभिनंदनाचा वर्षाव !!

रायते विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत डंका, अभिनंदनाचा वर्षाव !!

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवणा-या पद्मश्री आण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या रायते विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रायते या शाळेचा विद्यार्थी कु हार्दिक अरुण तरे याने महाराष्ट्र राज्य राज्यस्यरीय कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सी एस पाटील,  इतर शिक्षकांनी व परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली/केंद्र शासन  यांच्यामार्फत कला उत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते.

राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत रायते विद्यालयातील मुलींमध्ये __ कु खुशी पदमाकर पवार, मुलांमध्ये __ कु हार्दिक अरुण तरे याची राज्यस्तरीय निवड स्पर्धेसाठी __ सौ निशिगंधा चौधरी मॅडम अधिव्याख्याता, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जि ठाणे यांनी राज्यस्तरीय निवड स्पर्धेसाठी निवड करून, या राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत ३६ जिल्ह्यातील ३६ स्पर्धक उपस्थित होते आणि ही राज्यस्तरीय निवड स्पर्धा २१ नोव्हेंबर  रोजी महात्मा ज्योतिराव फुले पुणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड पुणे येथे पार पडली या दोन्ही विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सादरीकरण केले यामध्ये कु हार्दिक अरुण तरे याने महाराष्ट्र राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक फडकवला या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक म्हणून कल्पेश शिंदे सर, यांचे शिक्षण उपसंचालिका, नेहा बेलसरे मॅडम, सौ निशिगंधा चौधरी मॅडम अधिव्याख्याता जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जि ठाणे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी एस पाटील सर, पर्यवेक्षिका सौ माळी मॅडम, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...