Tuesday, 21 November 2023

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकाम टोल फ्री क्रमांक बंद !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकाम टोल फ्री क्रमांक बंद !!

*सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त*

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून याबाबत तक्रार करण्याकरिता दोन टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत परंतु हे दोन्ही टोल फ्री क्रमांक बंद असून नागरिकांनी अनधिकृत बांधकामाची तक्रार कोठे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून चाळ माफिया भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गुंडांनी वडवली, अटाळी, मोहणे, टिटवाळा, बल्ल्यानी, मोहिली, बल्याणी रोड आधी भागात अनधिकृत बांधकामांचा हैदोस घातला आहे. आपल्या विरोधात कोणी लेखी तक्रार करू नये म्हणून हे भूमाफिया गुंड नागरिकांना धमकी देतात आपल्या विरोधात तक्रार केल्यास हेच गुंड तक्रारदाला दाराला जीवे ठार मारण्यासाठी धजावत नाहीत. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपल्या विरोधात तक्रार करणाऱ्याचे नाव कर्मचारी उघड करतात. तक्रारदाराच्या जीविकास धोका निर्माण करतात.

याबाबत अनेकदा लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा अशा अनधिकृत बांधकामावर गेंड्याची कातडी असलेले अधिकारी योग्य ती कारवाई करीत नसल्याने तक्रार हतबल झाल्याचे पहावयास मिळते, यालाच आळा बसावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 18002334392 आणि 18002337295 हे दोन टोल फ्री क्रमांक सुरू केले होते परंतु हे दोन्ही टोल फ्री क्रमांक सध्या उचलले जात नसून केवळ नागरिकांना रिंगटोन ऐकायला मिळत आहे.

त्यातच अ प्रभाग क्षेत्रातील बांधकामाची तक्रार करण्यासाठी  प्रशासकीय अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे या मात्र फोन उचलत नसल्याने पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तयार होत आहेत. सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांना अनेकदा फोन करून सुद्धा त्यांनी फोन उचललेले नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले असून याबाबत पालिका आयुक्त इंदू जखड यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांना तक्रार करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेले टोल फ्री नंबर कधी सुरू होतात तसेच पालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे नागरिकांचे फोन कधीपासून उचलायला सुरुवात करतात की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...