Monday, 20 November 2023

छठपूजेनंतर उल्हास नदीकाठावर कच-याचा ढिग, प्रदूषणास जबाबदार आयोजकांच्या विरोधात तक्रार करणार ?

छठपूजेनंतर उल्हास नदीकाठावर कच-याचा ढिग, प्रदूषणास जबाबदार आयोजकांच्या विरोधात तक्रार करणार ?

कल्याण, (संजय कांबळे) : १७ते २० नोव्हेंबर या कालावधीत हजारो उत्तर भारतीय आणि बिहारी बंधू-भगिनींनी उल्हास नदीच्या काठावर छठ पूजा उपवास साजरा केला, मात्र केलेल्या छठ पूजा उपवासानंतर म्हारळ, वरप,पाचवामैल या ठिकाणी कचरा, प्लास्टिक, फॉइल, गोणी, बाटल्या आणि इतर प्रदूषणकारी वस्तूंचा मोठा ढीग साचला आहे. यामुळे लाखो लोकाची जीवनवाहिनी ठरलेल्या उल्हास नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून याची वेळीच दखल न घेतल्यास छठ पूजेच्या आयोजका विरोधात जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे उल्हास नदी बचाव समितीचे अश्विन भोईर व विवेक गंभीरराव यांनी सांगितले आहे.

सध्या कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. अशातच पाणी प्रदूषणाची बाब देखील समोर येत आहे. कल्याण तालुक्यातून वाहत येणारी उल्हास नदी ही लाखो नागरिकांची जीवनवाहिनी ठरलेली आहे. ७ महानगरपालिका व अनेक ग्रामपंचायतीचे सुमारे ५० लाखांच्या वर नागरिक या नदीचे पाणी पितात. मात्र १७ ते २० नोव्हेंबर या दरम्यान उत्तर भारतीय व बिहारी बांधवांनी छठ पूजा उपवास साजरा केला. यावेळी नदीच्या काठावर कचरा, प्लास्टिक बाटल्या, कप, गोणी, फाँईल, आदी प्रदूषणकारी कच-याचा ढिग पडलेला आहे. पण उत्सवाच्या दिवशी व्यवस्थेवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या आयोजकांनी उत्सवानंतर नदीकाठची स्वच्छता न केल्याने नदीप्रेमी आणि उल्हास नदी बचाव समितीचे अधिकारी अश्विन भोईर यांनी रोष व्यक्त केला आहे.

आयोजक आमदार कुमार आयलानी, रिजन्सी अँटिलिया व्यवस्थापन व इतर आयोजकांनी नदीकाठची तात्काळ स्वच्छता करावी, अशी मागणी केली असून स्वच्छता न केल्यामुळे नदी प्रदूषित झाली असून त्यामुळे या नदीचे पाणी पिणाऱ्या ७ महानगरपालिकांच्या  व हजारो ग्रामपंचायतीच्या  नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. यासाठी आयोजक यांना जबाबदार धरून त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडे तक्रार करण्यात येईल अशी संतप्त प्रतिक्रिया नदी मित्रानी दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अँटेलिया येथील गणेश घाटावर गणेश विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र छठ पूजेसाठी अशी बंदी का घातली गेली नाही, शिवाय या ठिकाणी शासकीय जमिनीवर एका ट्रस्ट ने रातोरात मंदिर उभे केले याला आमदार कुमार आयलानी यांचा आशीर्वाद नाही का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दिनेश मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...