Monday, 20 November 2023

कारागिर आणि मजूरांसाठी मोदी सरकारची विश्वकर्मा योजना; कानूर खुर्द येथे २८३ कारागीरांचे अर्ज !!

कारागिर आणि मजूरांसाठी मोदी सरकारची विश्वकर्मा  योजना; कानूर खुर्द येथे २८३ कारागीरांचे अर्ज !!

मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :

           पंतप्रधान मान. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १८ पारंपारिक कारागिरांना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने महत्वकांशाची विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे.या योजनेची सुरुवात कानूर खुर्द येथे आज करण्यात आली.
            भारतात विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात, त्यापैकी विशिष्ट समाजाचे लोक काही प्रकारच्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असतात. अशाच प्रकारचा एक समाज आपल्या देशात आहे तो म्हणजे विश्वकर्मा समाज. या विश्वकर्मा समाजातील लोक विविध पारंपरिक व्यवसायायत गुंतलेले आहेत अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्ती अशी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नुकतीच सुरु केली आहे.सरकारने या योजनेला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना असे नाव दिले आहे, ज्यामध्ये विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 140 जातींचा समावेश केला जाणार आहे.

            या योजनेचे  विधानसभा समन्वयक सचिन बल्लाळ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शांताराम बापू कानूर (कानूर गावचे नवनियुक्त सरपंच ), देवेंद्र भाऊ नार्वेकर, दिलीप पाटील, तुकाराम गावडे, तुकाराम गावडे, तुकाराम कांबळे, अश्विनी कांबळे, वैशाली गावडे, मधुकर गावडे, अनंत झेंडे (चिटणीस संगमनेरिकर) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या महत्वपूर्ण योजनेचे उद्घाटन करण्यात आले. ‘हे’ कारागीर योजनेचे लाभार्थीसुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपारिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर या योजनेचे लाभार्थी असणार आहेत. मी जिल्हा परिषद सदस्य. अनेक योजना तळागाळात पोचवले आहेत तरी एक नामी संधी म्हणून या योजनेच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक घटकाला याचा लाभ देण्याचा प्रामाणिक व निष्ठेने काम करणार आहे भारतीय जनता पार्टीने दिलेली संधी आणि त्या संधीचे सोने सोने करण्याचे काम मी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणार आहे. पण आज आपल्याला मोदी साहेबांच्या महत्त्वाकांक्षा योजनेमुळे आज तळागाळापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत ही योजना पोचवण्याचं काम मी चंदगड मध्ये प्रामाणिकपणे करणार आहे. या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच मला भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत ही चाललेल्या अनेक योजना अनेक नियोजन असते त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उत्स्फूर्तपणे काम करण्याची ऊर्जा मिळते त्याचबरोबर अध्यक्ष शांताराम बापू म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक तरुण हा भारतीय जनता पार्टीला जोडला जात आहे. तरुण वर्गासाठी काहीतरी देणे लागतो त्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन लावलेला आहे आणि कॅन नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण सहजरित्या पोचू व आपण लाभ देण्यास कुठेही कमी पडणार नाही.पप्पू सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत आभार मानले. त्याचबरोबर आज कानूर खुर्द येथे २८३ अर्ज भरणे झाल्याचे सरपंच देवेंद्र भाऊ यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...