जनपहारा मराठी वृत्तपत्र आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या १५ व्या स्नेह संमेलनात पत्रकार / समाजसेवकांना दिला समाज कल्याण पुरस्कार !!
*प्रतिनिधीना केले निस्वार्थी सन्मान पुरस्काराने सन्मानित*
नालासोपारा, (सौ.मनस्वी मनवे/एस. गुडेकर) :
नालासोपारा पूर्व येथील कांचन विद्यालय, विजय नगर, नालासोपारा (पूर्व) येथे जनपहारा मराठी वृत्तपत्र आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या १५ वे स्नेह संमेलन मोठया थाटामाटात संपन्न झाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यमांच्या सहाय्याने विविध घटकातील नागरिकांना होणाऱ्या असुविधेच्या विरोधात उभे ठाकलेले महाराष्ट्रातील नामवंत मराठी वृत्तपत्र म्हणजेच जन पहारा साप्ताहिक आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज होय.
वर्धापन दिनाच्या सुरवातीला संपादक श्री.जितेंद्रजी शिंदे यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापुजा संपन्न झाली. उच्च न्यायालय कर्मचारी श्री.चंद्रकांत करंबेळे यांची प्रथम या कार्यक्रमला उपस्थिती लाभली. सुरवाती पासूनच समाजात निस्वार्थी कर्तव्य करत असलेल्या समाजसेवकाना "समाज कल्याण पुरस्कार-२०२३ ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये जेष्ठ पत्रकार, शासकीय अधिकारी, समाजसेवक, रुग्णसेवक, महाराष्ट्र पोलीस, नगरसेवक, सभापती, संघटना, तर काही फाउंडेशन यांचा ही प्रामुख्याने विचार करण्यात आला. शिस्तबद्द नियोजनाने सर्व मान्यवरांची मने जिंकली.
यामध्ये मान्यवर म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिकारी पी.आय श्री.शिंदे साहेब, कॉन्स्टेबल प्रकाश ननावरे, समाजसेवक व उच्चन्यायालय कर्मचारी चंद्रकांतजी करंबेळे, जेष्ठ पत्रकार शांताराम गुडेकर (दै. अग्रलेख कोकण /मुंबई विभागीय संपादक), राष्ट्रीय सैनिक संस्था व लायन्स क्लबचे पदाधिकारी प्रशांत पाटील, मंत्रालय प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील, समाज सेवक मनोज दादा राऊत, संभाजी मालप, साई छाया स्कुलचे संस्थापक डॉ.संजय जाधव, रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळ मान्यवर, साई एकदंत रहिवाशी सेवा संघ. समाजसेवक किशोर भेरे, रायजीबाई धोंडु शिंदे प्रतिष्ठान सदस्य काशिनाथ शिंदे, उद्योजक परशुराम पारावे,अनंत पाटील समाजसेवक, संदीप शिंदे (२४ प्राईमव्हिजन न्युज), कुणबी समाज मंडळ शिपोळे, शिव संभा प्रतिष्ठान, राजेश चंद्रकांत पोरे (अखिल भारतीय जनहित पार्टी -महाराष्ट्र अध्यक्ष) अमित बबन चव्हाण (बिंदास जिंदगी फाउंडेशन), मानव विकास संरक्षण समिती अध्यक्ष विजय कुऱ्हाडे, अर्नाळा मा. जिल्हा परिषद सदस्य देवराम पाटील, अर्नाळा सरपंच नंदकुमार घरत, गडकिल्ले रक्षक प्रशांत सोगम, समाजसेवक अनंत फिलसे, समाजसेवक प्रकाश नाडकर, समाजसेवक नीलेश तेलंगे, वैभव पालव, इत्यादी मान्यवर लाभले. प्रत्येक मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. मत व्यक्त करताना आयोजक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत कार्याचे कौतुक केले.तर प्रत्येक प्रतिनिधीना "निस्वार्थी सन्मान पुरस्कार-२०२३" देऊन सन्मानित करण्यात आले. विशेषतः या कार्यक्रमाला प्रतिनिधीचा कौटुंबिक मेळावा म्हणून मानले जात असताना भव्य दिव्य कार्यक्रमाची जबाबदारी प्रत्येक प्रतिनिधी स्वतः शिरावर घेऊन पार पाडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक दिपक मांडवकर आणि निलिमा झिंजे, अंतरा दरेकर यांनी केले. संपादक जितेंद्रजी शिंदे यांनी प्रतिनिधी आणि मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमची सांगता केली.
No comments:
Post a Comment