आज मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नमन प्रयोगाचे आयोजन !!
शाहीर विनोद फटकरे निर्मित - श्री काळेश्वरी नाटय नमन मंडळ,मुंबई ( मढाळ - गुहागर ) यांचा या मोसमातील मुंबई रंगभूमीवरील प्रथम शुभारंभ प्रयोग
लोकप्रिय गायक/शाहीर प्रकाश पांजणे यांच्या मधुर आवाजाने रसिक प्रेक्षक होणार मंत्रमुग्ध
"काय सोंगा हायतं" एक धम्माल विनोदी लोकनाट्य आवर्जून पहा ; कोकणातील एक कटु सत्य विषद करण्याचा माझा सादरीकरण मधून प्रयत्न - नाट्यकृतीचे लेखक/दिग्दर्शक - प्रदीप रेवाळे यांचे रसिक प्रेक्षकांना प्रतिपादन
मुंबई (दिपक कारकर /शांताराम गुडेकर )
कोकण म्हणजे कलेचं माहेरघर होय.इथ अनेक कलांचा उगम झाला. कोकणातील बहुप्रिय नमन लोककला आता मुंबईसारख्या ठिकाणी सादरीकरण होण्याची सुरुवात सर्वत्रित सुरू झाली आहे. अशा लोककलेचं सादरीकरण करत कोकण सह मुंबई रंगभूमीवर लोकप्रिय असणाऱ्या शाहीर विनोद फटकरे निर्मित श्री काळेश्र्वरी नाटय नमन मंडळ ( मढाल - मुंबई ) यांचे स्त्री - पुरुष पात्रमय नमन आज सोमवार दि.२० नोव्हेंबर २०२३ रात्रौ ०८ : ३० वा. मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले ( पूर्व ) येथे सादर होणार आहे. गोड आवजाचे शाहीर / गायक प्रकाश पांजणे यांच्या आवाजातील मधुर गाणी रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. अधिक माहितीसाठी शाहीर विनोद फटकरे - ९३७२५३८१८६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment