Tuesday, 5 December 2023

कल्याण पश्चिमेचे आमदार श्री. विश्वनाथ भोईर साहेब यांच्या शुभहस्ते समाज मंदिराचे लोकार्पण !!

कल्याण पश्चिमेचे आमदार श्री. विश्वनाथ भोईर साहेब यांच्या शुभहस्ते समाज मंदिराचे लोकार्पण !!

*विकासकामाचा शब्द दिला आणि काम पूर्ण केले* 

कल्याण, नारायण सुरोशी : लोकांनी मागणी केली... आमदार महोदयांनी त्यांना शब्द दिला आणि अवघ्या काही महिन्यांतच हे विकासकाम पूर्ण झाले. असा जबरदस्त अनुभव कल्याण पश्चिमेतील संत रोहिदास वाडा येथील नागरिकांना आमदार श्री. विश्वनाथ भोईर साहेब यांच्याबाबतीत आला आहे. 

कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ३५ येथील संत रोहिदास वाडा परिसरात एक सुसज्ज असे समाज मंदिर आणि सभागृह बांधले जावे अशी तेथील स्थानिक नागरिकांची मनापासून इच्छा होती. आणि ही इच्छा त्यांनी कल्याण पश्चिमेचे आमदार श्री. विश्वनाथ भोईर साहेब यांच्याकडे बोलून दाखवली. मग काय.. आमदार भोईर साहेब यांनी कोणताही वेळ न दवडता या समाज मंदिर - सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. काही महिन्यांपूर्वी ही इमारत बांधण्याचे काम सुरू होऊन ठराविक वेळेतच ते पूर्णही झाली. या संत श्री रोहिदास यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या सुसज्ज इमारतीचे आज आमदार श्री. विश्वनाथ भोईर साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रभाग क्र. ३५, रोहिदास वाडा येथील समाज बांधवांना सामाजिक सभागृहाचे अभिवचन आपण दिले होते. आपण दिलेला हा शब्द आज सत्यात उतरत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद असल्याची भावना आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केली. 

या लोकार्पण सोहळ्यात माजी नगरसेवक रमेश वाळंज, विष्णू सातवे, उपशहर प्रमुख विनोद गायकवाड, विलास भोईर, सचिन सोष्टे, महेश भोईर, योगेश साळवे, विकास रोकडे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...