कल्याण तालुक्यात नद्यावरील पुलावर नैसर्गिक आपत्ती पेक्षा' चोरट्यांची, आपत्ती अधिक, जबाबदारी कोणाची ?
कल्याण, (संजय कांबळे) : प्रवासी, वाहनचालक, नागरिक, ग्रामस्थ पर्यायाने सर्व जनतेचा प्रवास सुखकर व्हावा, दळणवळणाच्या सोईसुविधा झाल्याने त्या परिसराचा विकास होतो यासह आदी विविध कारणापोठी शासन नद्या, नाले, ओळ यांच्या वर पुल बांधते, काही ठिकाणी पुरामुळे त्यांचे अतोनात नुकसान होतेही, या नैसर्गिक आपत्तीला सरकार कसेबसे तोंड देतेही, मात्र मानवनिर्मित अर्थात चोरट्यांच्या सततच्या आपत्ती ला कसे तोंड देणार? हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे,
कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार मुख्य नद्या आहेत, या नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यत यांच्या वर शेकडो पुल बांधण्यात आले आहेत, अगदी तालुक्याचा विचार केला तर उल्हास रायते, बारवी दहागाव, काळु रुंदा, भातसाई, खडवली व वासुर्दी आदी ठिकाणी पुल आहेत, या पुलावर संरक्षित पाईप लावण्यात आले आहेत. मागील काही वर्षांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे व आलेल्या पुरामुळे या पुलाच्या पाईपा वाहून गेल्या आहेत, खडवली पुलावर एकही पाईप शिल्लक राहिलेली नाही, रुंदा, रायते व दहागाव, या पुलावरील थोड्या पाईप वाहून गेल्या आहेत, बाकी बहुतांश संरक्षित पाईप सुरक्षित आहेत,
यातील उल्हास नदीवरील रायते पुलाच्या पाईपा नुकत्याच दुरुस्त, वेल्डिंग करण्यात आल्या आहेत, मात्र दहागाव येथील बारवी नदीवर असलेल्या अनेक पाईप चोरट्यांनी कापून नेल्याचे दिसत आहे, हे पाईप एक्सो ब्लेट ने कापल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, विशेष बाब म्हणजे येथील खांब देखील नटबोल्ट काढून नेले आहेत, ज्यांचे नटबोल्ट निघले नाहीत ते तसेच ठेवण्यात आले आहेत, हे सर्व अलीकडेच केले असल्याचे दिसून येत आहे, काही ठिकाणी पाईप कापून तसेच ठेवले आहेत, म्हणजे अगोदर लुज करुन ठेवायचे व संधी मिळताच पाईप चोरायचे असा इरादा चोरट्यांचा दिसून येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे काय फक्त कल्याण तालुक्यात आहे असे मुळीच नाही, तर शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिंवडी आदी तालुक्यात काही वेगळी परिस्थिती नाही, कल्याण ते नगर रस्त्यावर रायते, आबोळे, तळवली इत्यादी ठिकाणी पुल आहेत, शिवाय मुरबाड तालुक्यातील कनविरा नदीवर सिंगापूर, वैशाखरे, करचोंडे, वाघवाडी, खापरी, न्याहारी, सावर्णे, फांगणे, एकलरे, असे एकट्या काळुनदीवर घाटातील उगमापासून ते संगमापर्यत १५ च्या आसपास मुख्य व अंतर्गत रस्त्यावर पुल आहेत, त्यांच्या ही पाईपा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या परिसरात एक म्हणच प्रचलित झाली आहे ती म्हणजे, ४ पाईपा आणल्या म्हणजे घर होते, एवढेच नाही तर या तालुक्यातील एका शासकीय अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी, आमदार, खासदार, हे गावात सोईसुविधा मिळाव्या, लाईट यावी म्हणून सोलर सिस्टिम उभारतात, मात्र याचेही सोलर बँटरी, पंप, अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र आदी वास्तूचे दरवाजे, खिडक्या,शेतकऱ्यांचे मोटार पंप, इतर साहित्य गायब होत असते,यातून एकाद्या दारुड्या चोंराचा ४ दिवसांचा दारुचा प्रश्न सुटतो, मात्र इतरांचे किती नुकसान होते, कामे थांबतात, अडचणी येतात, याचा विचार कोण करतो? त्यामुळे शेवटी प्रश्न निर्माण होतो, ही जबाबदारी नक्की कोणाची? प्रत्येकाने जबाबदारी झटकली, हात वरती केले तर कसे चालेल, प्रत्येकाने मग ते पोलीस, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, नागरिक, तरुण मंडळी यां सर्वांनी हे गाव, तालुका, जिल्हा माझा आहे, वास्तू माझ्या आहेत, त्या जपल्या पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे असा निश्चय केला व त्याची अंमलबजावणी केली तर अशा घटना टाळल्या जातील, अन्यथा आधीच सरकार उदास त्यात तेरावा मास, किंवा सरकारी काम अन् ५ वर्षे थांब असे म्हणण्याची व ऐकण्याची वेळ आपल्या वर येवू शकते.
No comments:
Post a Comment