चोरे गावाच्या सौ. नाजुका सनी कवळे यांचे अल्पशा आजाराने निधन, गावावर शोककळा !
कराड, (प्रतिनिधी) ::कराड तालुक्यातील चोरे गावाच्या शांत, संयमी प्रेमळ स्वभावाच्या सौ नाजुका सनी कवळे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे, त्यांच्या निधनाने चोरे गावावर शोककळा पसरली आहे.
सातारा तालुका कराड मधील चोरे गावाच्या सौ नाजुका सनी केवळे या गृहिणी म्हणून काम करत होत्या, शांत, संयमी, मनमिळाऊ स्वभावामुळे त्या गावात लोकप्रिय होत्या, लहानांपासून ते थोरा मोठ्यापर्यत सगळे त्यांना वहिनी म्हणून संबोदत होते. अशा या सौ नाजुका कवळे यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी अल्पशा आजाराने २१ डिसेंबर रोजी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पती सनी कवळे, मुले आदित्य (१५) व समर्थ (१२) आणि सासरे असा परिवार आहे. त्यांचा माती, दशक्रिया विधी रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी चोरे, ता. कराड जिल्हा सातारा येथे सकाळी ९ वाजता होणार आहे असे कवळे परिवाराने कळवले आहे.
No comments:
Post a Comment