कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ, सप्टेबंरचा शिक्षक पुरस्कार सोहळा डिसेंबर अखेरीस, शिक्षकांचा निषेध?
कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा बहुचर्चित शिक्षक पुरस्कार सोहळा पंरपरेप्रमाणे याही वेळी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी न होता तब्बल ३/४ महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर च्या अखेरीस कसाबसा 'फाँरम्यालिटी, म्हणून पार पडला परंतु सालाबादप्रमाणे याही वर्षी याला वादाची किनार लागली, ति इतकी टोकाला गेली की ५ शिक्षक संघटनापैकी ४ अध्यक्षानी स्वाक्षरीने गटशिक्षणाधिका-याच्या निषेधार्थ पत्र शिक्षण विभागाला दिले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या तील समन्वयाच्या अभावामुळे शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सुमारे ४५० च्या आसपास शिक्षक आहेत, अध्यापनाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करतात. देशाचे भावी चांगले नागरिक, अधिकारी, घडविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात, अशा शिक्षकांचा गौरव व्हावा, त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी शिक्षणासाठी उत्तम योगदान देणा-या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
वास्तविक पाहता हा सोहळा याच दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी होणे अपेक्षित असते पण कल्याण तालुक्यात तसे होताना दिसत नाही. नुकताच कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील ८ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्काऱासाठी निवड केली, मात्र तो देण्यासाठी तब्बल ४ महिन्याचा कालावधी घालवला. तो देतानाही कार्यक्रम स्थळ असे निवडले की या हॉलमध्ये शिक्षकांना बसायला जागाच राहिली नाही, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील या सोहळ्याला मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी रुपाली खोमने आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते तालुक्यातील ८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला, यानंतर आमदार किसन कथोरे यांनी भाषण करताना शिक्षण विभागातील बट्ट्याबोळ व समन्वयाचा अभाव पाहून ५ सप्टेंबर चा पुरस्कार सोहळा डिसेंबर मध्ये घेता हे कसे काय?केवळ फाँरम्यालिटी म्हणून हा सोहळा करता का? असा प्रश्न उपस्थित करून पुढच्या वर्षी असे चालणार नाही असा दमही दिला. हे कमी की काय म्हणून तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या एकाही पदाधिकाऱ्यांचे एखादे गुलाब फुलं देऊन स्वागत केले नाही, इतकेंच नव्हे तर ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांना देखील प्रातिनिधीक स्वरूपात बोलण्याची संधी दिली नाही, त्यामुळे शिक्षकांचा पारा चढला, शिक्षकांनी अधिका-याना चांगलेच धारेवर धरले. आणि तालुक्यातील ५ शिक्षक संघटनापैकी ४ संघटनेच्या पदाधिका-यानी स्वाक्षरी सह गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विभागाचा निषेध करणारे पत्र या विभागाला दिले.
वर्षातील इतका महत्त्वाचा आणि शिक्षकाप्रती आदरभावना व्यक्त करणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा केवळ २० ते २५ मिनिटात उरकण्यात आला. शिक्षकांना बसायला जागा नाही, विद्यार्थ्यांचे कार्यक्रम रद्द झाले, पदाधिकाऱ्यांना मानपान नाही, या सोहळ्याला तब्बल ४ महिने लागले, शालेय पोषण आहार वाटून बहुतांश शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान, पालकांचा संताप, यासर्वातून शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक यांच्यातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला, त्यामुळेच शिक्षण विभागात बट्ट्याबोळ सुरू झाला आहे.
* प्रतिक्रिया __
*कुमार आयलानी(आमदार, उल्हासनगर विधानसभा)
कांबा येथे शिक्षक पुरस्कार सोहळा आहे याची मला माहिती नाही,
* डॉ भाऊसाहेब कारेकर (जिल्हा शिक्षणाधिकारी, ठाणे) __
शिक्षक पुरस्कार सोहळा हा त्याच दिवशी व्हायला हवा, तो का लांबला याची चौकशी करतो, शिक्षकांचे काम इतके चांगले आहे की रोज त्यांचा सन्मान व्हायला हवा,
No comments:
Post a Comment