महापालिकेच्या २/ब प्रभागातील रस्ता रुंदीकरणात बाधीत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई !
कल्याण, नारायण सुरोशी: महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांचे निर्देशानुसार २/ब प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण (पश्चिम) येथील सापाड गांव रिक्षा स्टँड ते गणपती मंदीर रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणात बाधीत एकूण १० बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.
सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे अधीक्षक भूषण कोकणे व कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी, खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., १ डंपरच्या सहाय्याने करण्यात आली.
तसेच सदर रस्त्याचे काम आज पासून सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment