Thursday 4 January 2024

12 जानेवारीपासून महाराष्ट्रातील 76000 आशा व गटप्रवर्तक महिला जीआर मिळेपर्यंत बेमुदत संप करणार !!

12 जानेवारीपासून महाराष्ट्रातील 76000 आशा व गटप्रवर्तक महिला जीआर मिळेपर्यंत बेमुदत संप करणार !! 

*अंगणवाडी संपालाही पाठिंबा*

चोपडा, प्रतिनिधी.. गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये मानधन वाढ, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा जीआर काढल्याशिवाय 12 डिसेंबर पासून बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक संघटना कृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिला आहे याबाबत सविस्तर असे की,

29 डिसेंबर पासूनच सर्व ऑनलाईन कामावर सर्व आशा गटप्रवर्तक महिलांनी बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामाबाबत सक्ती करता कामा नये. अन्यथा त्या विरोधीही तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे अखिल भारतीय आशा  गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ. शंकर पुजारी कळवले आहे असेही पत्रकात नमूद केले आहे पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केलेला होता. यासंदर्भात आठ नोव्हेंबर रोजी सन्माननीय तडजोड झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. या घटनेस दोन महिने झाले आहेत. तरी अद्याप महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे. आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीने महाराष्ट्रामध्ये 4 डिसेंबर पासून सुरू असलेल्या अंगणवाडी महिलांच्या संपाला पूर्ण पाठिंबा दिलेला आला. 

जळगाव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार  भागीदारी करावी असे आवाहन राज्यसचिव कॉ सुमन पुजारी, तसेच जळगाव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार  भागीदारी करावी असे आवाहन जळगाव जिल्हा आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक आयटक संघटनेने केले आहे तशा आशयाचे निवेदन जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन, संघटक सुलोचना साबळे, प्रतिभा पाटील, मालू नरवाडे, संगीता माळी, कळणा महाले, सुनिता ठाकरे, मिनाक्सी सोनवणे, कविता कोळी, विद्यादेवी बाविस्कर, मनीषा पाटील, शालिनी पाटील, वंदना सोनार, वंदना पाटील, उज्वला पाटील, रेखा पाटील, शारदा महाजन, प्रतिभा नेहरकर, सरला कोळी, भारती सपकाळे, जाहिरा फारुकी, सीमा मराठे, बबिता बरेला, संगीता पाटील, प्रतिज्ञा पाटील, ज्योत्स्ना खंबायत, स्वाती सपकाळे, दुर्गा सपकाळे, गायत्री जोशी, सविता ओली ,शीला सपकाळे, सविता मेघे आदींनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...