Thursday 4 January 2024

रेझींग डे निमित्त कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे विविध उपक्रम !!

रेझींग डे निमित्त कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे विविध उपक्रम !!


कल्याण, प्रतिनिधी : ०३ जानेवारी २०२३ कल्याण (पश्चिम) वाहतूक शाखेमार्फत राबविण्यात ०२ जानेवरी २०२४ ते ०८ जानेवारी २०२४ या कालावधीत रेझिंग डे सप्ताहच्या अनुषंगाने पोलिस-जनता संबध दृढ व्हावे, तसेच शाळकरी मुला मुलींना वाहतूक नियम व सुरक्षा तसेच वाहतूक शाखेचे कामकाज विषयी माहिती व्हावी व त्यांच्यात लोकशाही मूल्ये जागरूक व्हावे, ह्या उद्देशाने कॅप्टन रविंद्र माधव विद्यालय कल्याण पश्चिम येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम या विषयी माहिती देऊन त्यांना वाहतूक नियमांना करता वापरण्यात येणारे 'इ' चलन मशीन, वॉकीटॉकी, ब्रिथ ऍनालायझर मशीन यांची माहिती देऊन पीपीटी द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी सहायक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी, कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


तसेच ०४ जानेवारी रोजी सिध्दार्थ प्राथमिक मराठी शाळा, गाळेगाव, मोहने येथील विद्यार्थ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी आपल्या कार्यालयात वाहतूक नियम व हेल्मेट, सेफ्टी बेल्ट तसेच इतर वाहतूक प्रणाली या विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी सदर शाळेचे शिक्षक विवेक घुगे सर व विद्यार्थी व विद्यार्थिनी व वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक हजर होते.

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...