Friday 19 January 2024

शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग आयोजित शालेय स्पर्धेत समता विद्या मंदिरचे घवघवीत यश !!

शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग आयोजित शालेय स्पर्धेत समता विद्या मंदिरचे घवघवीत यश !!

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :
                विद्यार्थ्यांचा शारीरिक , भावनिक आणि मानसिक विकास घडवा या उद्देशाने शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध सहशालेय स्पर्धेत साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी भरघोस बक्षिसे जिंकली. स्पर्धेत समता विद्या मंदिर शाळेतून लहान आणि मोठा असे दोन गट तयार करण्यात आले होते. लोकनृत्य मधून लहान आणि मोठ्या गटास द्वितीय क्रमांक मिळाला तर लेझिम मध्ये प्रथम क्रमांक . एकपात्री अभिनय मध्ये रेश्मा शेखर चासकर या शिक्षिकेने तृतीय तर विद्यार्थी मधून माधुरी धनराज शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तालुका स्तरीय एल वार्ड विज्ञान प्रदर्शनात देखील विद्यार्थी व शिक्षकांनी कमाल केली. रेश्मा चासकर यांनी विज्ञान प्रदर्शनात तयार केलेल्या लोकसंख्या शिक्षण या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच हर्ष वर्मा व रेहान खान या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मोठ्या गटातील मॅन होल डिटेक्टर या प्रकल्पाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. या दोन्ही विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय पातळीवर करण्यात आली आहे. यावेळी विज्ञान प्रदर्शन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धे मध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. अभिवाचन स्पर्धेत मोठा गट सृष्टी लाडे हिला प्रथम क्रमांक , हस्ताक्षर स्पर्धा मोठा गट सायली शिंदे हिला द्वितीय क्रमांक प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठा गट संजना पाष्टे आणि प्रतीक्षा थोरात तर निबंध स्पर्धा लहान गट जयेश कुचेकर याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले अशी माहिती समता विद्या मंदिर शाळेचे सचिव राजेश सुभेदार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...