Friday 19 January 2024

अंगणवाडी आशा गटप्रवर्तक एकजुटीचा मोर्चा.. मागण्या मान्य करून संप मिटवा ! मागणीवर भर !!

अंगणवाडी आशा गटप्रवर्तक एकजुटीचा मोर्चा.. मागण्या मान्य करून संप मिटवा ! मागणीवर भर !!

चोपडा, प्रतिनिधी... अंगणवाडी दीड महिन्यापासून तर आशा आठ दिवसापासून संपावर आहेत दोघा भगिनी कामगारांच्या  मागण्या साम्य आहे तेव्हा मानधन वाढ द्या ! आशांची रखडलेली भाऊबीज द्या. !! शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता ध्या आशाना आठ नोव्हेंबर २३ रोजी दिलेले आश्वासन प्रमाणे शासकीय परिपत्रक काढा, या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मध्ये तोडगा काढा या मागण्यांसाठी चोपडा येथे आज रोजी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तालुका आयटक तर्फे जोरदार  एकजुटीच्या मोर्चा चोपडा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. 

त्यावेळी  मोर्चातील सहभागी आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कचेरी परिसर घोषणांनी  दणाणून सोडला तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर केले. त्याच्या पाठपुरावा करण्याची त्यांनी आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व आयटक राज्य उपाध्यक्ष कॉ अमृत महाजन, अंगणवाडी संघटनेच्या तालुकाध्यक्ष मीनाक्षी सोनवणे, अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष ममता महाजन यांनी केले .  

*मोर्चाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनात विनाकारण घोळ घालण्याचे काम एडवोकेट सदानंद गुणरत्न करीत आहेत म्हणून त्यांचे बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली* महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 26 हजार अठरा हजार रुपये पगार द्यावी सेवानिवृत्तांना पेन्शन लागू करावी तसेच वाडीच्या खाऊ शिजवणाऱ्या बचत गटांची थकीत बिल बरोबर प्रत्येक लाभार्थी मागे १६ रुपये खर्च करावेत अशा आशयाच्या मागण्या च्या निवेदन बरोबर आशांच्या /गतप्रवर्टक यांचे पंधरा हजार/ सतरा हजार रुपये मानधन वाढीचे आश्वासनानुसार शासकीय परिपत्रक काढावे लाभ देताना एपीएल बीपीएल भेद नको रखडलेली भाऊबीज द्यावी असे दोन स्वतंत्र निवेदन तहसीलदार यांना देण्यात आली मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुष्पावती मोरे करिष्मा शिंदे मीना वानखेडे कोकिळा महाजन मंगला पाटील पूजा साळुंखे शोभा नेवे नशिबात तडवी लता पाटील नर्मदा कोळी आशा साळुंखे कल्पना खंबायत उषाबाई ब्राह्मणे व आशा संघटनेतर्फे जयश्री मोरे सरला कोळी निर्मला साळुंखे रेखा पाटील रमत तडवी सिंधुबाई पाटील योगिता पाटील वंदना सोनवणे कल्पना कुंभार ललिता कोळी सुनंदा कोळी आदी भगिनींच्या समावेश होता
येत्या 21जानेवारी रोजी जळगाव जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका मदतीस यांचे 22 जानेवारी रोजी नवीन मदतनीस याना  एकच दिवशी मिळालेल्या पण अलग अलग तारखांच्या नोटिसांची उत्तरे चोपडा कार्यालयाला सादर करण्यात येणार आहेत. 23 जानेवारी रोजी आशा व गट प्रवर्तक यांचे जळगाव जिल्हा परिषदेवर उपोषण करण्याची नियोजन केलेले आहे . या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला संबंधित अंगणवाडी अशा गटप्रवर्तक मदतीस यांनी वेळेवर अकरा वाजता उपस्थिती द्यावी असे आवाहन अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व आशा गटप्रवर्तक संघटनेने केले आहे.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...