Friday 19 January 2024

महाबळेश्वर तालुका रहिवाशी संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन, सन्मान भूमीपुत्रांचा पुरस्कार सोहळा नालासोपारा तेथे संपन्न !!

महाबळेश्वर तालुका रहिवाशी संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन, सन्मान भूमीपुत्रांचा पुरस्कार सोहळा नालासोपारा तेथे संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /दिपक मांडवकर) :

              शिव कृपा हॉल, मोरेगाव नालासोपारा ( पु ) याठिकाणी संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन आणि संघटनेचा सन्मान भूमिपुत्रांचा पुरस्कार सोहळा २०२४ एकदम थाटामाटात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित मान्यवर संघटनेचे आधारस्तंभ विश्वास सावंत, मार्गदर्शक रमेश दादा शेलार, कल्पेशभाऊ सकपाळ, अशोक भानसे, राजेंद्र भगत, रमेश चव्हाण, विठ्ठल कदम, सुनील जाधव, पंढरीनाथ पाटील, प्रमोद पाटील, अजिंक्य देवघरे, सागर शेलार आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळायला पुष्प हार अर्पण करून तर सौ.रेश्मा चव्हाण, सौ.माया भगत, सौ.हेमालता शेलार, सौ.सायली नर, सौ.नदमा हसन, सौ.करुणा मोरजकर, सौ.रेणू तिवारी, सौ.सोनाली देवघरे आदी महिला मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. संघटनेचे कार्यध्यक्ष नितिन सकपाळ यांनी संघटनेने दोन वर्षात केलेल्या अहवाल वाचून दाखवला.
           कु. आर्यन अनिल जाधव याने गायलेल्या सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवड्याने मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात झाली अनेक मुलांनी मराठमोळ्या गाण्यावर आपली आदाकारी सादर केली.जमलेल्या जानसुदयाने त्याला टाळ्या वाजवून खूप चांगला प्रतिसाद दिला.
         त्या नंतर सन्मान भूमिपुत्रांचा पुरस्कारासाठी निवड झालेलेल्या सन्मान मूर्ती विश्वास सावंत (समाज सेवक,मराठा नेते, महामंत्री - वसई विरार जिल्हा भाजपा ) रमेश शेलार.(समाज सेवक,कामगार नेते, सचिव - वसई विरार जिल्हा भाजपा ), अंकुश मोरे ( उद्योजक, मोहिनी ट्रान्सपोर्ट ), सुनील जाधव ( समाज सेवक,पत्रकार ), शांताराम कदम ( उद्योजक नवलाई एक्वा टेक), कल्पेश सकपाळ ( श्री गणेश पतसंस्था ), आनंद शिंदे ( उद्योजक,भैरवनाथ इंटरप्राईजेस ), राजेंद्र भगत ( मॅनेजिंग डायरेक्टर, प्रथमेश प्रेसिजन ) अजिंक्य देवाघरे ( मुंबई पोलीस ), पांडुरंग भोसले ( उद्योजक,कुणाल असोसिएट्स ),
 प्रकाश सकपाळ ( उद्योजक, प्रकाश ट्रान्सपोर्ट ), सागर शेलार ( अध्यक्ष - आधार महाराष्ट्र स्पोर्ट्स फाऊंडेशन 
आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू/प्रशिक्षक ), नितिन जोशी ( सुमित इंटरप्रिंजेस ) यांना संघटननेने सन्मान भूमिपुत्रांचा पुरस्काराने सन्मानित केले. महिलांसाठी हळदी कुंकू आणि सन्मान नारी शक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा ( श्री. गणेश पतसंस्था )  सहयोगाने आणि संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला त्यामध्ये  अनेक महिला सहभागी झाल्या. त्यामध्ये अप्रतिम  खेळ खेळत पैठणीच्या प्रथम क्रमांकच्या विजेत्या ठरल्या सौ. सोनाली अजिंक्य देवघरे. द्वितीय क्रमांक सौ. संगीता कृष्णा जंगम. तर तिसरा क्रमांक सौ. मोहिनी अक्षय जंगम यांनी पटकवाला.
       या वेळी पुरस्कार सन्मान मूर्ती बरोबर  पंकजदादा देशमुख ( शिव सेना जिल्हा प्रमुख ) उदयदादा जाधव ( विरार शहर प्रमुख ), किशोर पाटील ( मा. नगरसेवक ), अजितभाऊ खांबे ( शिव सेना उपतालुका प्रमुख ), पंढरीनाथ पाटील ( मा. नगरसेवक ), सौ. रेश्मा चव्हाण ( मा. नगरसेविका ), राजेश उतेकर ( शिवसेना शहर सचिव ), प्रमोद पाटील ( युवा विभाग अध्यक्ष बहुजन विकास आघाडी ), संतोष शिंदे ( शाखा प्रमुख ), मधुकर जवळ, किसन घाडगे, लक्ष्मण मोहिते ( वार्ड अध्यक्ष ), सतीश ढगाळे, रोहित शेलार. विठ्ठल कदम, रमेश चव्हाण, नागेश जंगम, अशोक मोरे, संतोष जाधव, नितिन घाणेकर, महेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक  विठ्ठल शिंदे, अध्यक्ष - अरुण जंगम, कार्यध्यक्ष -  नितिन सकपाळ, उपाध्यक्ष -  शंकर जंगम, सचिव - संतोष गो. कदम. उपसचिव -  शिवाजी शेलार, राजेश कदम प्रवक्ते.खजिनदार - सुनिल जंगम, युवाअध्यक्ष -  संतोष कदम, युवाउपाध्यक्ष - नितिन जाधव, युवा सचिव - गणेश शेलार, नालासोपारा शहर अध्यक्ष - अंकुश जाधव, उपशहर अध्यक्ष - दिपक जाधव, शहर सचिव - आनंद कदम, उपशहर सचिव -  महेश पवार,विरार शहर अध्यक्ष -  अनिल जाधव.नालासोपारा संपर्क प्रमुख - दिपक सकपाळ तुळींज विभाग अध्यक्ष -  विठ्ठल जाधव, आचोळे विभाग अध्यक्ष - गणेश कदम, नागीनदास पाडा विभाग अध्यक्ष - हरिचंद्र शिंदे. मोरेगाव विभाग अध्यक्ष -  तानाजी सकपाळ, जिजाई नगर विभाग अध्यक्ष - प्रदीप शिंदे.श्री रामचंद्र जाधव विठ्ठल जंगम, बळवंत  कदम, श्याम सुतार, बाळासाहेब सकपाळ, लक्ष्मण कुंभार, महेंद्र जंगम यांच्या अथक परिश्रमाणे महिला आघाडी च्या अध्यक्ष - सौ.प्रियांका आ.कदम. उपध्यक्ष - सौ आरती अ.जंगम.कार्यध्यक्ष - सौ. वर्षा सं. कदम. सचिव - सौ. सुषमा नि. सकपाळ. उपसचिव - कु. समीक्षा शि. शेलार ( कराटे चॅम्पियन ) खजिनदार सौ. संध्या सु. जंगम.संघटक - सौ. रेश्मा रा. कदम.सौ. निर्मला शं. जंगम.सौ. भारती अं. जाधव. सौ.सुमन रा.जाधव, सौ सुनिता सं. कदम, सौ सुविधा अ. जाधव, सौ. मनीषा वि. जंगम, सौ. वंदना दि. जाधव, सौ रंजना बा. सकपाळ, सौ. छाया ग. शेलार, सौ.सुवर्णा म. पवार, सौ वैशाली ता.सकपाळ, सौ. सुरेखा ल. कुंभार, सौ. सुरेखा नि. जाधव, सौ.सविता ग. कदम, सौ.कविता दि. सकपाळ, सौ. पूजा प्र. शिंदे, सौ. शोभा वि. जाधव, सौ. शकुंतला ब. कदम, सौ. राजश्री म.जंगम यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. संघटनेचे अध्यक्ष - श्री. अरुण जंगम यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रवक्ते राजेश कदम यांनी केले.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...