Wednesday 10 January 2024

"का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला" नाटयप्रयोग पुन्हा मुंबई रंगभूमीवर ; खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था ( रजि.) तर्फे आयोजन !

"का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला" नाटयप्रयोग पुन्हा मुंबई रंगभूमीवर ; खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था ( रजि.) तर्फे आयोजन !

मुंबई -  ( दिपक कारकर )

विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील खंडाळा पंचक्रोशी कुणबी संघटनेची स्थापना कै. मुकुंद बाळू धनावडे यांच्या प्रेरणेतून आणि विद्यमान अध्यक्ष केशव भातडे यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबर २०१६ रोजी स्थापन झाली. पंचक्रोशीतील गावांमधून एक समन्वय आणि या विभागातील सर्व गावांना एकत्र करून यांच्यातील दुवा म्हणून संघटना गेली ७ वर्षे सतत कार्यरत आहे.तरुणांचे मजबूत संघटन असणाऱ्या उपरोक्त संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाट्यप्रयोगाचे आयोजन गुरुवार दि.११ जानेवारी २०२४ रोजी रात्रौ ०८:३० वा. मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, (पूर्व) येथे करण्यात आले आहे.

श्री माऊली एन्टरटेन्मेंट ( मुंबई ) प्रस्तुत, एका वर्षात ३ यशस्वी नाटयप्रयोग सादर करून,रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या सामाजिक नाट्यकृतीचा ४ था प्रयोग मुंबई रंगभूमीवर होतोय. सामाजिक विषयावर अचूक भाष्य करत, सद्यस्थितीत परिस्थितीवर प्रखररित्या प्रबोधन करणारे व प्रत्येकाच्या जीवन संसारात कधी - कधी वाट्याला येणाऱ्या प्रसंगांची हि वास्तवदर्शी कहाणी प्रेरणा देणारी आहे.सुप्रसिद्ध नाट्यलेखक गणेश हिर्लेकर लिखित, गोपीचंद देसाई दिग्दर्शित आणि अनंत ( दादा ) गोताड निर्मित ही नाट्यकृती सदोदित पहावी अशीच आहे.

संस्थेच्या आर्थिक उन्नती व सामाजिक उपक्रमांकरिता निधी संकलन जमा करण्याच्या सदर स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन,हया नाट्यप्रयोगाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था ( रजि.) तर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी केशव भातडे - ९२२३२५७५५३,शाहीर दामोदर गोरीवले - ७५०६०६६०३१ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...