Tuesday 9 January 2024

कल्याण पंचायत समितीवर शासनाच्या नोटिसांची 'होळी पेटणार? अंगणवाडी सेविका आक्रमक, सरकार थंड !

कल्याण पंचायत समितीवर शासनाच्या नोटिसांची 'होळी पेटणार? अंगणवाडी सेविका आक्रमक, सरकार थंड !

कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या एक ते दिड महिन्यापासून आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्यातील अंगणवाडी सेविका, व मदतनीस यांच्या मागण्याचा विचार न करता उलट त्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटीस शासन देत आहेत. त्यामुळे या रणरागिणीआता अधिक आक्रमक झाल्या असून उद्या कल्याण पंचायत समितीवर या नोटांच्या जाहीर होळी, करणार आहेत. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास हे अंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून अंगणवाडी कर्मचारी यांनी राज्य व्यापी बेमुदत संप केलेला आहे. मोर्चे, थाळीनाद, निषेध, ठिय्या, जेलभरो, आझाद मैदानात अंदोलन अशा विविध प्रकारे शासनाचे लक्ष वेधण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी यांनी केले, मात्र या निगरगट्ट शासनाने याकडे लक्ष दिले नाही, तसे पाहिले तर अंगणवाडी सेविका व मदतनीस हा शासनाचा अंत्यत महत्त्वाचा कर्मचारी!काही शासकीय योजना, आरोग्य विभागाच्या योजना, विविध प्रकल्प, ग्रामपंचायतीच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम हे या कर्मचाऱ्यांच्या शिवाय शक्य नाही, ऐवढीच कशाला? तर कोरोनाच्या काळातील यांची सेवा अतुलनीय व कौतुकास्पद होती, यावेळी अनेक कर्मचारी मृत्यू पावले होते, इतकेच नव्हे तर जे आता सत्तेत व विरोधात आहात, त्यांना देखील निवडणुकीत निवडून आणण्यासाठी यांनी प्रयत्न केले आहेत, कारण या सेवेका व मदतनीस डायरेक्ट लोकांच्या घरापर्यंत पोहचत असतात, आज ठाणे जिल्ह्यातील कुपोषण कमी झाले आहे याचे सर्व श्रेय यानाच दिले पाहिजे.

वरीष्ठ अधिकारी एसीत बसून आदेश देतात मात्र हे कर्मचारी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्यांची अंमलबजावणी करत असतात. असे असताना त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी ते संपावर आहेत, शासनाने त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना न्याय द्यायला हवा, उलट सरकार त्यांच्या वर कारवाचा बडगा उगारत आहे, जाहिरात बाजी, शासन आपल्या दारी, अथवा इतर अनेक कामासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत, मात्र प्रामाणिकपणे, इमानेइतबारे काम करणाऱ्या या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे आता हे कर्मचारी आक्रमक झाले आहेत, काही दिवसांपूर्वी एका कर्मचा-या मृत्यू झाला आहे. हे अशीच परिस्थिती राहिली तर सरकार यांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का, असा सवाल हे कर्मचारी उपस्थित करत आहेत.

त्यामुळे कल्याण तालुक्यातील ९८ सेविका व १०८ मदतनीस यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटीस बजावण्याचे काम सुरू केले होते. मात्र हे कर्मचारी घाबरले नसून उद्या या नोटिसांंची जाहीर होळी कल्याण पंचायत समितीच्या आवारात करणार आहे, असे अंदोलन संपूर्ण राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात सुरू केले आहे, यातून ही सरकारने काही निर्णय घेतला नाही तर मात्र ते अधिक चिघळू शकते, त्यामुळे शासनाने वेळीच शहाणे होऊन आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...