Tuesday 9 January 2024

वयोवृध्यासाठी दंत शिबिर आणि महिलांसाठी मासिक पाळी, कर्करोग व आरोग्य तपासणी !!

वयोवृध्यासाठी दंत शिबिर आणि महिलांसाठी मासिक पाळी, कर्करोग व आरोग्य तपासणी !!

नवी मुंबई, प्रतिनिधी :

'डॉ. पतंगरवजी कदम साहेब, संचालक भारती विद्यापीठ' यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आणि 'डॉ. विश्वजीत कदम (बाळासाहेब)' याच्या वाढदिवासानिमित्य भरती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालय एनएसएस संघातर्फे वयोवृध्यासठी दंत शिबिर, स्नेहलता वृध्या आश्रम, शांतीवन नेरे येथे आयोजित करण्यात होते, त्यामध्ये प्रामुख्याने ५०-६० वयोवृध्द नागरिकांनी लाभ घेतला.. 

तसेच वाकडी गाव येथे महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती करण्यात आली. ह्यांमध्ये प्रमुखाने महिलांसाठी आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब, साखर, ECG, पेपस्मिर ह्यासारख्या तपासणी झाल्यावर त्यांना कर्करोग- स्थन व गर्भाची पिशवी, मासिक पाळी मध्ये घ्यायची काळजी, चांगला आहार ह्या सारखे कार्यक्रम पथनाट्य व हेल्थ एजुकेशन द्वारे देण्यात आले.. ह्या शिबरमध्ये भारती विद्यापीठ दंत महाविद्याय, नवी मुंबई, भारती विद्यापीठ मेदिकोवर हॉस्पिटल खारघर यांचे मोलेचे सहकार्य भेटले..

ह्या शिबिरामध्ये भारती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी वैभवकुमार पोवार, स्मिता रेवणकर, सायली शेटे, मधुस्मिता बाहेरा, शांतीवन आश्रमाचे सचिव विनायक शिंदे व स्नेहलता वृध्दाश्रमाच्या सचिव सुनीता, वाकडी गावचे सरपंच कुदा पवार, उपसरपंच निता पाटील, ग्रामसेवक सचिन पाटील आणि सर्व ग्रामपंचायत वाकडी गावचे सदस्य याचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...