Tuesday 9 January 2024

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी जळगावला आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयावर 16 जानेवारीपासून बेमुदत धरणे व 21 ला जेलभरोचा इशारा !!

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी जळगावला आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयावर 16 जानेवारीपासून बेमुदत धरणे व 21 ला जेलभरोचा इशारा !! 

चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार पुकारलेला आहे, त्यात येत्या 16 जानेवारीपासून 21 जानेवारी पर्यंत नामदार गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालय म्हणजेच भाजपा कार्यालय जवळ बेमुदत धरणे व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हा महासंघाने जाहीर केलेल्या पत्रकात दिलाआहे, यासाठी विविध जिल्ह्यातून कर्मचारी 16 ते 21 जानेवारी काळात जळगाव जिल्ह्यात  धडकणार आहेत, तसेच सहाव्या दिवशी म्हणजे 21 जानेवारी रोजी जळगाव येथे प्रचंड जेल भरो आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नेते कॉ. तानाजी ठोंबरे मिलिंद कुमार गणवीर, कॉ नामदेवराव चव्हाण हे करणार आहेत अशी माहिती. जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पत्रकात देण्यात आली आहे.. 

याबाबत सविस्तर असे की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अभय यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा. 10 ऑगस्ट 2020 रोजी मान्य केलेले किमान वेतन 2018 पासून लागू करून त्याप्रमाणे फरक बिलाची 51 महिन्याची थकबाकी द्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उत्पन्न वसुलीची जास्त अट रद्द करा लोकसंख्येची जाचक अट व आकृतीबंध रद्द करून आकृती बंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा किमान वेतन व दहा टक्के आरक्षणाचा लाभ घ्या, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे प्रत्येक वर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या आधारावर भरती प्रक्रिया गतिमान करा. सामाजिक न्याय देण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करा. अनुकंपाप्रमाणे दहा टक्के आरक्षणाच्या भरतीसाठी दरवर्षी कार्यवाही करा. शासनमान्य राहणीमान भत्ता शंभर टक्के शासनाच्या तिजोरीतून मिळावा, ग्रॅच्युइटी अर्थात उत्पन्नाचे निष्कर्ष बदलून दहा कर्मचारी आणि पन्नास हजार रुपये मिलण्याची अट रद्द करा, भविष्य निर्वाह निधीची खाती अद्ययावत करा.. कपातीच्या रकमंच्या पावत्या व पासबुक द्या. किमान वेतनाची मुदत फेब्रुवारी 2023 ला संपली असल्यामुळे नवीन सुधारित किमान वेतनासाठी समिती गठन करा या मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत परंतु ग्रामीण विकास मंत्री या कर्मचाऱ्यांचा प्रश्णी बेफिकीर आहेत त्यामुळे नाईलाजाने ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यात 16 पासून जळगाव नाशिक धुळे जिल्ह्यातील प्रतिनिधी आंदोलन करणार असून 17 जानेवारी रोजी पुन्हा जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्हे सहभागी होणार आहेत अशा तरहेने पाच दिवस पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून 21जानेवारी रोजी प्रचंड जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. असा इशारा महासंघाने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या असून त्या दृष्टीने जोरदार तयारी चालू आहे, आंदोलनाचे निमंत्रण जळगाव जिल्ह्यातील कामगार नेते व महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार पडले.

या आंदोलनाला जिल्ह्यातून 1000 कामगार दोन दिवस भागीदारी करणार आहेत अशी माहिती जिल्ह्याचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे  राज्यसचिव कॉ. अमृत महाजन, जिल्हा अध्यक्ष संतोष खरे, सचिव राजेंद्र खरे, उपाध्यक्ष किशोर कनडारे, अशोक जाधव, अशोक गायकवाड , शिवशंकर महाजन, संजय कंडारे, प्रदीप जोशी, राजेंद्र कोळी आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...