Monday 8 January 2024

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेची 'ऐसी की तैसी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबी नंतर देखील म्हारळ गावात हत्या !

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेची 'ऐसी की तैसी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबी नंतर देखील म्हारळ गावात हत्या !

कल्याण, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे, वेडेवाकडे, गैरकृत्य करणाऱ्या विरोधी कडक कारवाई करा, तसे आदेश मी उपमुख्यमंत्री या नात्याने पोलिसांना देत आहे. अजित पवार यांनीअसे विधान करून ४८ तास होत नाही तोच म्हारळगाव खदाणी परिसरात ८/१० जनांच्या टोळक्याने एका तरुणाची गोळया घालून हत्या केल्याची घटना रात्री उशिरा म्हारळगाव परिसरात घडली. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेची' ऐसी की तैसी झाली आहे.

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६०/७० गावाचा समावेश आहे, यातील म्हारळ, वरप, कांबा, उबार्णी, बल्याणी, खडवली, टिटवाळा आदी गावाचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे, लाखांचा घरात लोकसंख्या आणि इनमिन ४/५ पोलीस, चौकीसाठी, त्यातच गुन्हेगारी चे होत असलेले उदात्तीकरण, त्याला मिळणारा राजकीय आश्रय यामुळे आज या गावामध्ये कोणते गैरधंदे नाहीत असे म्हणायचे काय कारण नाही, म्हारळ गावातील खदाणी पट्टा तर आड्डाच बनला आहे, या परिसरात खून, मारामारी, हाणामारी, तोडफोड झाली नाही असा दिवस उगवणे अवघडच ! अगदी म्हारळ पोलीस चौकीच्या बाजूला म्हारळ सोसायटी ते म्हारळपाडा पर्यंत संध्याकाळी सहानंतर चे चित्र पाहिल्यावर परिस्थिती लक्षात येते. 

अगदी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरप येथील मेळाव्यात ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले, जे कोणी वेडीवाकडी, गैरधंदे करून दहशत माजवत असतील त्यांच्या वर कडक कारवाई करावी असे आदेश दिले होते, याला ४८ तास देखील होत नाही तोपर्यंत म्हारळ गावातील खदाणी परिसरात उघड्यावर दारुपित बसलेल्या तरुणापैकी एका राजन एलकर नावाच्या तरुणावर एका जमावाने रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. इतर त्याचे मित्र पळून गेल्याने ते वाचले.

विशेष म्हणजे अगदी अल्पवयीन तरुणांकडे सहज रिव्हॉल्व्हर, चाकू, गुफ्ती, तलवार अशी जिवघेणी शस्त्रास्त्रे आढळून येतात हे पोलिसांचे अपयश नाही का? आज गुन्हेगारावर व त्यांच्या टोळ्यावर पोलिसांचा वचक आहे का? आर्थिक हितसंबंधांपोटी कारवाई टाळली जाते का? आतापर्यंत हद्दीत शेकडोंच्या वर जीवघेणी शस्त्रे सापडली आहेत. कारवाई किती गुन्हेगारावर झाली? या गुन्हेगारांचा त्रास सर्व सामान्य जनतेला होत आहे, यातून स्थानिक ग्रामस्थ व गावाचे नाव बदनाम होत आहे, याचा विचार कधी केला जाणार, यातून पोलिसांच्या विरोधात जन आंदोलन झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...