Thursday 11 January 2024

नालासोपारा येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

नालासोपारा येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

नालासोपारा , प्रतिनिधी : शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारा येथे मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधे वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
नालासोपारातील नागरीकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावेत या हेतूने हे आरोग्य शिबीर महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले.

या आरोग्य शिबीरात सुमारे 360 नागरीकांनी लाभ घेतला. 110 नागरीकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 16 मोतीबिंदु रूग्ण मिळाल्याने त्यांचे लवकरच मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी शिवशक्ती मित्र मंडळाचे व जेष्ठ पत्रकार रविंद्र माने  यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबीराचे उध्दघाटन रिपब्लिकन पार्टीचे नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष सुरेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शिवसेना लोकसभा समन्वयक नविनजी दुबे, उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, जिजाऊ तालुकाप्रमुख हर्षाली खानविलकर, बहुजन विकास आघाडीचे अनिता पाटील, शिवसेना महिला उप शहरप्रमुख आशा सातपुते उपशहरप्रमुख महेश निकम,  सामाजिक कार्यकर्त्या स्मिता वैद्य, हर्षा मॅडम जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक अमित नाईक, अभिषेक गोरूले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...