Thursday 11 January 2024

सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडले पाहीजे - प्रदीप वाघ

सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडले पाहीजे - प्रदीप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा

छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खोच येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्हणून मोखाडा पंचायत समितीचे सभापती श्री प्रदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मोखाडा तालुक्याचे भविष्य हे विद्यार्थ्यांच्या हातात असुन, उद्याचा भावि नागरिक हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे, आणि असे विद्यार्थी घडले पाहीजेत अशी अपेक्षा श्री वाघ यांनी व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते, स्थानिक ढोल पथक, महिला भगिनींनी नृत्य सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले, हायस्कूल च्या शिक्षक व विद्यार्थी यांनी अतिशय सुंदर आयोजन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

या कार्यक्रमाला श्री प्रदीप वाघ, सभापती विठ्ठल चोथे, भाजपा नेते, श्री रोहित चक्रवर्ती, नंदकुमार वाघ नरेंद्र चौधरी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक शाळा समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...