Thursday, 11 January 2024

माणगाव कृषी विभागाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद - महेश मोरे

माणगाव कृषी विभागाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद - महेश मोरे

      बोरघर, माणगाव ( विश्वास गायकवाड ) : तालुक्यातील आदिवासी समाजाला टिकाऊ उपजीविका निर्माण व्हावी याकरिता कृषी विभाग तसेच विविध सामाजिक संस्था आप -आपल्या परीने सहकार्य करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व विकास दीप संस्था गेली अनेक वर्ष आदिवासी महिलांच्या बचत गटांना शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना देताना दिसत आहे .शेतीतील विविध प्रयोग जसे हळद लागवड , पावसाळी व उन्हाळी भात शेती लागवड ,नाचणी वरी लागवड, वृक्ष लागवड ,कडधान्य शेती याद्वारे शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभाग सदैव वस्ती पातळीवर येऊन शेतकरी समुदायाला मार्गदर्शन करताना दिसत आहे . निळज येथील गावदेवी विकास महिला बचत गटाच्या अध्यक्षा. श्रीमती. तारा काशीराम हिलम व येरद येथील वनमित्र बचत गटाचे अध्यक्ष श्री. राम कोळी या दोन लाभार्थ्यांना नाचणी मळणी यंत्र मंजूर होऊन त्याचे वितरण करण्यात आले. 
     सदर मळणी यंत्र कोकण कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले आहे .एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण व माणगाव कृषी विभाग यांच्या आत्मा या योजनेच्या सहाय्याने या लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 1,25 000/ हजार किमतीची मशीन देण्यात आली आहे .सदर मशीन शासन आपल्या दारी व रायगड जिल्हा कृषी महोत्सव या कार्यक्रमांमध्ये वाटप करण्यात आले .वाटपावेळी रायगड जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक श्रीमती.उज्वला बाणखेले मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव श्री .आनंद कांबळे ,तालुका कृषी अधिकारी श्री. अजय वगरे तसेच श्री. प्रमोद शिंदे (तालुका तंत्रज्ञान ), व श्री संतोष सुरडकर (कृषी सहाय्यक) कांदळगाव हे उपस्थित होते. 
      सदर मळणी मशीन बाबत सर्व विकास दीप संस्थेचे संचालक श्री.रिची भाऊ यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून मशीनची निगा कशी राखावी ,आजूबाजूच्या गावातील नाचणी उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना या मशीनचा उपयोग कसा करता येईल ,यातून गटाचे उत्पन्न कसे वाढवता येईल ..याविषयी मार्गदर्शन करून जिल्हा कृषी अधीक्षक, प्रकल्प अधिकारी पेण, उपविभागीय कृषी अधिकारी  माणगाव ,तालुका कृषी अधिकारी माणगाव व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे सर्व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...