Friday 12 January 2024

१३ वर्षाच्या मुली सोबत प्रेम संबंधातून शरीर संबंध; बलात्कार नाही -- उच्च न्यायालय.

१३ वर्षाच्या मुली सोबत प्रेम संबंधातून शरीर संबंध; बलात्कार नाही -- उच्च न्यायालय. 

भिवंडी, दिं,१२, अरूण पाटील (कोपर) :
          प्रेम संबंधातून झालेल्या शरीर संबंधामुळं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या एकल खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.
            सविस्तर हकीगत अशी की,अमरावती जिल्ह्यातील अंजन गावात एका अल्पवयीन मुलीचे आरोपी सोबत प्रेमातून शरीर संबंध झाले. मात्र त्यानंतर आरोपीनं बलात्कार केल्याचा गुन्हा मुलीच्या पालकांनी दाखल केला होता. त्या बाबतचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाला.
        त्यात  न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या एकल खंडपीठानं म्हटलंय आहे की "आरोपीनं वासनेनं नाही, तर प्रेमातून शरीर संबंध झाले हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करण्यात येत आहे" असा निर्णय देत बालिके सोबत शरीर संबंध करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयानं जामीन दिला.
               या प्रकरणात  अल्पवयीन मुलगी २३  ऑगस्ट २०२० रोजी तेरा वर्षाची होती. ती आपल्या घरातून मैत्रिणीकडं पुस्तक घेऊन अभ्यासाला जाते म्हणून गेली, परंतु ती परत आली नाही. ती परत न आल्यानं अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात पालकांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तपास केल्या नंतर आरोपी आणि मुलगी हे महाराष्ट्राच्या बाहेर बंगळुरू इथं आढळले. त्यामुळं पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून तो कोठडीतच आहे. मात्र आरोपीचं म्हणणं होतं की, की तिचे आणि त्याचे प्रेम संबंध होते. त्यामुळं हा बलात्कार नाही. म्हणून जामीन मिळावा. या संदर्भातील "सर्व तथ्य न्यायालयाच्या पटलावर आल्यामुळं बलात्कार नव्हे, प्रेम संबंधातून शरीर संबंध झाले" असं न्यायालयानं आपल्या निर्णयात नमूद केलं आणि आरोपीचा जामीन मंजूर केला..
             आरोपीच्या वतीनं वकिलांनी न्यायालया समोर मुद्दा मांडला, की "दोघांचे प्रेम संबंध होते. त्यामुळं मुलगी घरातून खोटं कारण सांगून पळून गेली. नंतर ते बंगळुरूला गेले, परंतु पोलिसांनी दिलेल्या जबानीमध्ये मुलीनं त्याच्याशी प्रेम संबंध असल्याचं कबूल केलं आहे. २०२० पासून आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल झालेला आहे."
            अल्पवयीन तरुणी सोबत करण्यात आलेल्या शरीर संबंधास कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळं सरकारी वकिलांनी अल्पवयीन मुली सोबत लैंगिक संबंधाला तिची संमती कायदेशीर नाही. त्यामुळं आरोपीच्या अर्जावर कोणतीही सहानुभूती दाखवू नये, आरोपीचा जामीन मंजूर करू नये," असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे.
              न्यायालयानं दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर आपल्या निर्णयात नमूद केलं की, या खटल्यामध्ये आरोपीवर आरोपपत्र दाखल झालं. परंतु त्या नंतर खटल्यात काही प्रगती झाली नाही. ही वस्तुस्थिती जर पाहिली तर, आरोपीचे आणि अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध होते, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यास काही हरकत नाही." त्यामुळं काही अटी आणि शर्तीवर त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जामीन मंजूर केला. नियमित संबंधित पोलीस ठाण्यामध्ये आरोपीकडून हजेरी लावावी, या अटीवर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...