Friday 12 January 2024

रोजगार हमी योजनेच्या कामांची सभापती प्रदीप वाघ यांनी केली पाहणी !!

रोजगार हमी योजनेच्या कामांची सभापती प्रदीप वाघ यांनी केली पाहणी !!

जव्हार, जितेंद्र मोरघा ,:

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करून मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती यांनी प्रत्यक्ष भेटी देण्याचा कार्यक्रम हाती घेतला असुन,आज त्यांनी आडोशी ग्रामपंचायत अंतर्गत शिरसगाव व मोहपाडा येथील कामांना भेटी दिल्या.

या भेटीत मजुरांनी नियमित पणे कामे सुरू राहीली पाहीजेत अशी मागणी प्रदिप वाघ यांच्या कडे केली.तसेच अनेक मजुरांच्या खात्यात पैसे जमा न होता इतर ठिकाणी पैसे जमा होत असल्याचे दिसून आले आहे,जॉब कार्ड, आधारकार्ड अपडेट अशा समस्या देखील असल्याचे वाघ यांच्या निदर्शनास आले आहे.याबबतीत तातडीने लक्ष दिले जाईल असे आश्वासन  प्रदीप वाघ यांनी दिले आहे.

पुढील काही दिवसांत तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन मनरेगा च्या कामांची पाहणी केली जाईल असे  प्रदीप वाघ यांनी सांगितले आहे. यावेळी आडोशी चे सरपंच बाळु घाटाळ, उपसरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कृषी सहायक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...