Sunday 7 January 2024

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार, कामाला लागा- अजित पवार, यांचे वरप येथील कार्यकर्ता मेळाव्यात आदेश !

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार, कामाला लागा- अजित पवार, यांचे वरप येथील कार्यकर्ता मेळाव्यात आदेश !

कल्याण, (संजय कांबळे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून ठाणे जिल्ह्याने पक्षाला चांगली साथ दिली आहे. परंतु आता वेळ कमी आहे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे, बुथ वाईज कमिट्या स्थापन झाल्या पाहिजेत, काम मोठे जिकिरीचं आहे, पण  कामाला लागा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कल्याण तालुक्यातील वरप येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दिले.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, सध्या सरकार पुढे अनेक प्रश्न आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल सरकार प्रयत्नशील आहे, ६२ टक्के आरक्षण सोडून उर्वरित हिस्यात मराठ्यांना आरक्षण द्यायला कोणाची हरकत नाही, मात्र काही जण टोकाची भूमिका घेत आहेत, मुंबई ला येण्याची भाषा करत आहे, हा देश राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो त्यामुळे कायदा कोणी हातात घेतरला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंरागे पाटील यांचे नाव न घेता दिला. तर वय झाले तरी काही जण थांबत नाहीत, अशी टिका शरद पवार यांच्या वर केली, तसेच काही जण विकासावर न बोलता भलत्याच विषयावर बोलतात, सध्या वाचाळवीरांची संख्या वाढत आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांच्या वर केली. 

ठाणे जिल्हा हा शहरी व ग्रामीण अश्या भागात विभागला असून ग्रामीण भागात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत, येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ती नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या वर गेली आहे. यावेळी येथील जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असे पवार यांनी सांगितले. तसेच ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारी बाबतीत त्यांनी पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले.

तर कार्यकर्ता मेळाव्यात प्रास्ताविक करताना ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भरत गोंधळे यांनी सांगितले की, माझ्या गावातून पक्षाला नेहमी चांगली साथ मिळाली आहे, पण निधी मिळत नसल्याने कामे होत नाही, आपण अद्याप पर्यंत कोणत्याही आमदार किंवा खासदारांकडे निधीसाठी गेलो नाही पण दादा आता आम्हाला निधी उपलब्ध करून द्या असे सांगुन कल्याण नगर मार्गाला स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप यांचे नाव देण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव आदी नेत्यांची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर शहापूर चे आमदार दौलत दरोडा, ठाणे शहर अध्यक्ष आनंद पंराजपे, नजीम मुल्ला, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी, याप्रसंगी अंगणवाडी सेविका, रेशनधान्य दुकानदार आदी संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. तसेच भरत गोंधळे व इतरांची ठाणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याने त्यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !!

आंगवली सोमेश्वर  ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !! ** तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरप...