Sunday 7 January 2024

ऐन थंडीच्या दिवसात स्वेटर व ब्लँकेटचे वाटप !!

ऐन थंडीच्या दिवसात स्वेटर व ब्लँकेटचे वाटप !!

जव्हार-जितेंद्र मोरघा
 
थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, विविध ठिकाणी थंडीच्या गारठ्यामुळे घडणाऱ्या घटना कानी पडत आहेत.  म्हणून समाजात विविध दाते स्वेटर, ब्लॅंकेट इत्यादींचे वाटप करत आहेत . भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रतिज्ञे प्रमाणे आपाल्या बांधवांसाठी दिनांक 06 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा साखर शेत नंबर एक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात आले यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये उबदार स्वेटर मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसून आला. केशव शिक्षण संस्थान  फाउंडेशन आणि आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळा साखरशेत येथे 250 मुलांना स्वेटर तसेच रोजपाडा येथे 300 कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या वाटप कार्यक्रमास केशव शिक्षण फाउंडेशन चे अध्यक्ष श्री देवीलाल पुरोहित जी, आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच दाभलोन सरपंच  सुदाम उंबरसाडा, साखरशेत ग्रामपंचायत च्या सरपंच अनिता अनिल चौधरी, उपसरपंच कव्हा अनिल चौधरी, शंकर भोरे, विष्णू घुटे, गणेश रोज, संकेत गडग इ. मंडळी तसेच साखरशेत केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर कावजी भोये, शाळेतील शिक्षक मौळे सर,भोये सर, भोये मॅडम, चौधरी सर, शेख सर, घुटे सर इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !!

आंगवली सोमेश्वर  ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !! ** तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरप...