Monday 7 October 2024

आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !!

आंगवली सोमेश्वर  ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !!

** तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच शीतल अणेराव यांच्या हस्ते गावाच्यावतीने स्वप्ना यादव यांचा सत्कार

 कोकण  (शांताराम गुडेकर) :

           घटस्थापनेपासून दसरा सणापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो.आंगवली येथील सोमेश्वर या ग्राम मंदिरात नवरात्र उत्सव सोहळा दर वर्षीप्रमाणे चालू वर्षी संपन्न होत आहे.यावेळी सर्व  लोकं एकत्र येऊन गुण्या गोविंदाने समरस होतात, व आनंद घेतात.प्रत्येक दिवशी पूजा, आरती, गरबा नृत्य, विविध कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
           आंगवली सोमेश्वर मंदिर येथे स्थापन झालेली ग्रामदेवतेच्या पालखीला वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आंगवली ग्रामदेवता सोमेश्वर यांच्यामार्फत तंटामुक्ती अध्यक्षा  माजी सरपंच शीतल अणेराव यांच्या हस्ते गावाच्या वतीने वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि. प. सदस्य मुग्धा जागुष्टे उपस्थित होत्या. स्वप्ना यादव यांनी यानिमित्ताने  शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ यांनी गरबा उत्सव चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल सोमेश्वर मंदिर मानकरी सहित सर्व ग्रामस्थ यांना तसेच  उत्सव आयोजकयांना धन्यवाद देत सर्व कार्यक्रमला शुभेच्छा दिल्या. ठिकाणी रोज गरबा आणि भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भक्त जणांनी प्रसाद व कार्यक्रमाचा  लाभ घ्यावा अशी आंगवली गावचे सर्व ग्रामस्थांच्याकडून विनंती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !!

आंगवली सोमेश्वर  ग्राम देवता मंदिर येथे वाशिस्ट मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची भेट !! ** तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरप...