Sunday 14 January 2024

पहिले ते नववी पर्यतच्या गोरगरीब, अनाथ मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलून सुरज ताम्हाणे यांनी वाढदिवस केला साजरा, समाजापुढे वेगळा आदर्श !!

पहिले ते नववी पर्यतच्या गोरगरीब, अनाथ मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलून सुरज ताम्हाणे यांनी वाढदिवस केला साजरा, समाजापुढे वेगळा आदर्श !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील बापसई गावाजवळील बेलकर पाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज  ताम्हाणे यांनी' एक मेका साह्य करु अवघे धरु सुंपत, या ओवी प्रमाणे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आडिवली गावातील गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी, वीटभट्टी कामगार आदींच्या इयत्ता १ ते ९ वी पर्यंत च्या मुला मुलींच्या सर्व शिक्षणाचा खर्च उचलला असून इतरही गावात या दिवशी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या या समाज उपयोगी कार्याचे सर्वाकडून कौतुक केलं जातं आहे.

कल्याण तालुका हा ग्रामीण व शहरी भागात विभागला आहे, एका बाजूला सर्व सोईयुक्त गावे, गावातील शाळा तर दुसऱ्या बाजूला रस्ते, दिवाबत्ती, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आदी गैरसोय असणारे वाड्या पाडे, गावे अशी परिस्थिती आहे. राजकारणी, अधिकारी, पदाधिकारी काही सार्वजनिक कार्यक्रम असला की आप आपली पाट थोपटून घेतात. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती' जैसे थे, अशीच आहे, त्यामुळे बेलकर पाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज ताम्हाणे यांनी आपला वाढदिवस हटके, इतरांपेक्षा वेगळा, समाजाला दिशा देणारा करण्याचे ठरवलं, याची सुरुवात आपल्या गावाशेजारील आडिवली गावातून करण्याचा निर्णय घेतला. या गावातील गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी, वीटभट्टी कामगार इत्यादींच्या इयत्ता १ते ९ वी पर्यंत च्या मुला मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला, यामध्ये कु. मोनिका लक्ष्मण,  कुऱ्हाडे, रुंजी कु-हाडे, नयना कु-हाडे, मनाली उमेश वाघ, सोनम परड, तेजस्विनी वाघ, अनुश्री बहादूर तिरुवा, निशा तिरुवा, पारस कु-हाडे, आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शिवाय जवळपास च्या अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सध्या, लग्न ,समारंभ, हळदी समारंभ अथवा वाढदिवस यांच्या वर लाखो रुपयांची उधळण केली जाते. हे चुकीचे आहे हे सर्वांना पटते. पण तसं न करण्याचे काही थांबत नाही, आज देशात, राज्यात, जिल्ह्यात अथवा तालुक्यात बेकारी भयानक वाढली आहे, कामधंदा नसल्याने तरुण पिढी गैरमार्गाकडे वळत आहेत, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, भविष्यात एक वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे. अशा वेळी आपण अनावश्यक खर्च टाळला व तो पैसा अश्या सामाजिक कार्यासाठी वापरला तर नक्कीच सामाजिक परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही, याचीच सुरुवात सुरज ताम्हाणे यांनी स्वतः च्या वाढदिवसापासून केली आहे, हे नक्कीच कौतुकास्पद व दिशा दर्शक आहे, त्यांच्या या चांगल्या कामाला शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही, या प्रसंगी स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...