Sunday 14 January 2024

शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदनी अभियानाला नालासोपारा शहरात सुरूवात.....

शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदनी अभियानाला नालासोपारा शहरात सुरूवात.....

*नालासोपारा शहर धनुष्यमय करणार शिवसैनिकांचा संकल्प.*

नालासोपारा, प्रतिनिधी :- शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या नेतृत्वात नालासोपारा शहरामध्ये पक्षप्रवेश सोहळा व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शेकडो नवीन शिवसैनिकांनी प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकापासून मराठी माणसाच्या प्रश्नासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासोबत नागरीक जोडले जात आहेत महाराष्ट्रात मराठी माणसाची होणाऱ्या कुचंबणेतून जन्माला आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना स्थापन झाली तेच नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे घेऊन जात आहेत.

शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी सतत जनसंपर्क ठेवत आपल्या मितभाषा व कामाच्या जोरावर महिलांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. युवकांच्या प्रश्नांवर काम करणारी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना व युवकांना समाजकारणात संधी देऊन त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ देणारी संघटना आहे.

विविध कला कौशल्य, शैक्षणिक उपक्रम राबवणारा शिवसेना पक्ष आहे, समाजाचं ही काही देणं लागत या हेतूने जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा व विकासात्मक, सकारात्मक राष्ट्रनिर्मिती मध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन शिवसेना लोकसभा समन्वयक नविनजी दूबे यांनी व्यक्त केल.

शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचे लोकसभा समन्वयक नविनजी दुबे, यांच्या हस्ते उध्दघाटन करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, शहर समन्वयक नंदु जाधव, महिला शहरप्रमुख रूचिना नाईक, शहर सचिव राजेश उत्तेकर, शहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, विभाग प्रमुख दानिश करारी, विभाग प्रमुख तानाजी जाधव महिला उपशहरप्रमुख आशा सातपुते, महिला विभाग संघटक कल्पना जाधव, उपशाखा प्रमुख प्रथमेश, उपशाखाप्रमुख सुजल जाधव व सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व समेळगाव नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...