Monday 8 January 2024

पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई !!

पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई !!

*तयार केलेल्या ७ खोल्या तर २५ अनधिकृत जोते जमीनदोस्त*

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली आहे. 

शहाड, अंबिवली, वडवली, मोहने, बल्याणी, गणेश वाडी, मोहीली रोड, मांडा, टिटवाळा आदी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींच्या खोल्यांचे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच चाळ आणि भूमाफियांनी अनेक अनधिकृत खोल्या बांधून नागरिकांना विकण्याचा सपाटा लावला होता. 

नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच अनधिकृत बांधकामाला आळा बसावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात धडक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये सात तयार खोल्या तर 25 अनधिकृत बांधकामांचे तयार जोते भुईसपाट करण्यात आले.

सलग दोन आठवड्यापासून अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरू असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांची चांगलीच दहशत निर्माण झाली असून अनधिकृत बांधकाम करणारे चांगलेच धास्तावले आहेत.

या धडक कारवाई संदर्भात सहायक आयुक्त प्रीती गाडे यांना विचारले असता यापुढे अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई होणार असून कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केल्यास संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्या वर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांनी सांगितले आहे.

ही कारवाई करण्यासाठी अनधिकृत बांधकाम पथकातील दत्तू शेवाळे, रुपेश सांगळे, राजू शीलवंत यांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक जेसीबी व पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केली केली.. पालिकेच्या या धडक कारवाईने कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे कौतुक होत असले तरी पुन्हा त्याच ठिकाणी असे बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...