Monday 8 January 2024

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) आणि अकिनो फाउंडेशन, चेंबूर तर्फे जवाहर विद्या भवन मराठी शाळेत आरोग्य शिबीर सह साहित्य वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) आणि अकिनो फाउंडेशन, चेंबूर तर्फे जवाहर विद्या भवन मराठी शाळेत आरोग्य शिबीर सह साहित्य वाटप !!

*आशियाई  जिमनॅस्टिक्स आणि जागतिक मल्लखांब स्पर्धेत प्रविण्याप्राप्त केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही केला  सन्मान* 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            मुंबई सह उपनगर, कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) आर.सी.एफ, चेंबूर आणि अकिनो फाउंडेशन, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर विद्या भवन, मराठी शाळा, आर.सी.एफ चेंबूर येथे मोफत शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना मोफत हायजेनिक किट, लोखंडी कपाट, औषधे, खाऊ आणि अन्य साहित्य वाटप तसेच मोफत नेत्र चिकित्सा, वैद्यकीय तपासणी व कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई जिमनॅस्टिक्स स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल आणि जागतिक मल्लखांब स्पर्धेत प्रविण्याप्राप्त केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव कार्यक्रम नुकताच चेंबूर येथे पार पाडला.

             या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे जय भगवान शर्मा (कार्यकारी संचालक, प्रशासन /लीगल अँड सी एस. कंपनी सेक्रेटरी आर सी. एफ ) शरद सोनवणे (मुख्य महाव्यवस्थापक) संतोष शिकतोडे (उप अभियंता, नवी मुंबई), प्रितेश कांबळे (अध्यक्ष -अकिनो), सचिव लोकमान्य शिक्षण संस्था- श्रीयुत माणिक पाटील, विश्वस्त लोकमान्य शिक्षण संस्था- श्रीयुत सुबोध आचार्य, डॉ. निकिता भाटकर (एम. डी ), डॉ. विनीत गायकवाड, डॉ. रजनीश कुमार, नेत्र तज्ञ डॉ. अग्रवाल, मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव -प्रदीप गावंड, उप अध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार सचिन साळुंखे, वैभव घरत, स्नेहा नानीवडेकर, नीलम गावंड, हनुमंता चव्हाण, प्रकाश शेजवळ, संतोष नाईक, सचिन पाटील, ऋषिकेश जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.सोनाली बोराडे, ऋतुजा जगदाळे, प्रीती एखंडे, अर्ना पाटील, अक्षता ढोकळे यांचा मान्यवर मंडळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय आचल गुरव हिचा कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई जिमनॅस्टिक्स स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल तर रुपाली  गंगावणे हिचाही जागतिक मल्लखांब स्पर्धेत प्रविण्याप्राप्त केल्याबद्दल उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. डॉ. निकिता भाटकर (एम. डी), डॉ. विनीत गायकवाड, डॉ. रजनीश कुमार, नेत्र तज्ञ डॉ. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्य शिबीर पार पडले.

           पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या १६ वर्षाहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत आहे. मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री.अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी, अंध विकलांग, वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते. गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प, नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ  गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे सर्वं पदाधिकारी, सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...