Monday 8 January 2024

म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत अठ्ठावीस लक्ष पाणी साठवण क्षमतेच्या टाकीसाठी वनजमिनीची परवानगी, दोन हजार चाळीसपर्यत ग्रामपंचायतीकडून नियोजन ?

म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत अठ्ठावीस लक्ष पाणी साठवण क्षमतेच्या टाकीसाठी वनजमिनीची परवानगी, दोन हजार चाळीसपर्यत ग्रामपंचायतीकडून नियोजन ?

कल्याण,(संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन भविष्यात या परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी पाणी साठवण टाकी असावी अशी भूमिका सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांनी घेतली आणि त्यांच्या या भूमिकेला खासदार डॉ श्रीकांत शिदे, आमदार कुमार आयलानी आणि उपसरपंच, व सर्व सदस्यांनी मोलाचे पाठबळ दिल्याने आज वनविभागाची वनजमिनची मंजुरी मिळाली असल्याने भविष्यात पाणी पुरवठ्यातील अनियमितपणा दूर होणार आहे. ही घटना नवीन वर्षातील अंत्यत समाधानकारक, सुखदायी, आंनद देणारी व गोड बातमी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

तालुक्यातील १७ सदस्य असलेल्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत झपाट्याने नागरीकरण झाले आहे. उल्हासनगर व कल्याण या शहराजवळ व कल्याण नगर मार्गावर हे गाव वसलेले असल्याने येथील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे, तरीही ग्रामपंचायत बहुतांश सोईसुविधा पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. गावाला लागुनच एमआयडीसी असल्याने येथे पाणी टंचाईची समस्या फारशी जाणवत नाही. परंतु विद्यूत पुरवठा खंडित झाला, किंवा लाईन लिकेज झाली तर मात्र काही भागात पाण्याची अडचण निर्माण होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी गावासाठी पाणी साठवून क्षमता असलेली टाकी बांधण्याची मागणी जोर धरू लागली.

नवनिर्वाचित सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारताच ५ डिसेंबर२०२२रोजच्या ग्रामसभेत संप व पंप हाऊस १ व २ भूस्थर जलकुंभ, उंच जलकुंभ, मुख्य जलवाहिनी, वितरण वाहिनी संदर्भात ठराव घेऊन तो मंजूर करून घेतला, तसा २/३ चा प्रस्ताव ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी तयार केला, मात्र जागेची अडचण निर्माण झाल्याने व केवळ वन विभागाची जागाच उपलब्ध असल्याने या जागेची मागणी करण्यात आली. सरपंच निलिमा म्हात्रे, उपसरपंच योगेश देशमुख, सर्व सदस्य आणि खासकरून ग्रामसेवक नितीन चव्हाण यांचे सातत्य व पाठपुरावा, खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी घातलेले लक्ष, आमदार कुमार आयलानी यांनी त्यांना दिलेली साथ यामुळे वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी, तालुका रेंज आँफिसर श्री चन्ने, तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ मनूज जिंदल, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, आदी अधिकारी व पदाधिकारी यांनी या वनजमिनीची पाहणी करून ती म्हारळ ग्रामपंचायतीस मिळावी म्हणून सकारात्मक प्रयत्न केले आणि अखेरीस या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले,

जलजीवन मिशन अंतर्गत वनजमिनीतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी अनुसूचित जमाती, व इतर पारंपरिक वननिवाशी अधिनियम २००६ च्या कलम ३ पोटकलम २ नुसार मौजे म्हारळ ता कल्याण येथील संरक्षित वन स नं ८१/अ, नवीन स नं १/१ अ, मधील०,४ हजार हे,(४हजार चौ मी) एवढे क्षैत्र संप व पंपहाऊस १/२ भूस्थर जलकुंभ, उंचजलकुंभ, मुख्य जलवाहिनी, वितरण वाहिनी टाकणे करीता मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात २०४० पर्यंत पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. असे नियोजन करण्यात आले आहे असे ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी सांगितले तर ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी, खासदार, आमदार, वरीष्ठ अधिकारी यांच्या मुळे ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोड बातमी मिळाल्याचे सरपंच निलिमा म्हात्रे आणि उपसरपंच योगेश देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...