Monday 8 January 2024

डॉ.रवी वैरागडे वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातून पद्म पुरस्कारासाठी नामांकित !!

डॉ.रवी वैरागडे वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातून पद्म पुरस्कारासाठी नामांकित !!

मुंबई, (मोहन कदम /शांताराम गुडेकर) :

          भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महामहीम राष्ट्रपती द्वारे दरवर्षी विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्वोच्च नागरी सन्मान, पद्म पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात येते. होमिओपॅथी विभागातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत प्रगत आरोग्य उपचार पद्धती विकसित करून असाध्य व्याधींवर उपचार करणारे, नागपूर स्थित डॉ. रवी वैरागडे यांच्या कार्याची दखल घेत भारतातील काही मान्यवर संस्थांनी त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात भरीव संशोधन करून दैनंदिन मानवी जीवन सुसह्य व्हावं यासाठी वैरागडे यांच्याद्वारे देश विदेशात अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच समुपदेशन कार्यशाळा, नव मतदार नाव नोंदणी अभियान, अनाथ युवक सहाय्य, डॉ अब्दुल कलाम शैक्षणिक पुस्तक वितरण अभियान असे सामाजिक व युवा मदत उपक्रम त्यांच्याद्वारे नियमितपणे राबविण्यात येत आहेत. व्हिजन इंडिया अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या पद्म पुरस्कार नामांकन साठी शुभकामना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...