Sunday 7 January 2024

जावली महाबळेश्वर तालुका संघर्ष मंडळ कौटुंबिक मेळावा नालासोपारा येथे उत्साहात संपन्न...

जावली महाबळेश्वर तालुका संघर्ष मंडळ कौटुंबिक मेळावा नालासोपारा येथे उत्साहात संपन्न...

वसई , प्रतिनिधी : वसई विरार शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले सातारा जिल्हातील जावली महाबळेश्वर तालुका संघर्ष मंडळाचा कौटुंबिक मेळावा नालासोपारा येथे नुकताच पार पडला,‌ नोकरी, व्यवसाय निमित्त वसई विरार शहरात स्थायिक झालेले सातारावासिय एका कुटूंबाप्रमाणे राहुन सर्वांच्या अडी अडचणी सोडवत असतात.

अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, महिलांसाठी हळदी कंकू, कब्बडी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिर आधार कार्ड शिबीर आयुष्यमान कार्ड शिबीर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा नालासोपारा शहरात जावली महाबळेश्वर मंडळ राबवत असते यामुळे वसई तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हळदी कुंकू, नृत्य, १० वी १२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार, मंडळाला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पाहुन कौटुंबिक मेळाव्यातुन एकीची भावना दिसून आली.

कौटुंबिक मेळावा गावाकडुन मुंबईत  येणाऱ्याना आधार असल्याने असे उपक्रम दरवर्षी व्हावेत. असा मेळावा घेऊन समाजात एक नविन आदर्श ठेवण्याचे काम जावली महाबळेश्वर संघर्ष मंडळ हे वसई तालुक्यात करत आहे असे शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी सांगितले.
जावली महाबळेश्वर तालुका संघर्ष मंडळाचा सर्व कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी शिवसेना लोकसभा समन्वयक नविनजी दुबे, उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, शहर सचिव राजेश उत्तेकर, उपशहरप्रमुख श्रीकांत शिंदे, विभाग प्रमुख प्रशांत टेलर, विनोद साहनी व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...