Sunday 7 January 2024

रेश्मा राजेंद्र जाधव यांच्या "हिरा हॉटेल"चा शुभारंभ लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते साडवली येथे संपन्न !!

रेश्मा राजेंद्र जाधव यांच्या "हिरा हॉटेल"चा शुभारंभ लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते साडवली येथे संपन्न !!

कोकण, (शांताराम गुडेकर /सौ.मनस्वी मनवे) :

       रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील कोसुंब पातळी येथील, रहिवाशी रेश्मा राजेंद्र जाधव तसेच कु.सागर राजेंद्र जाधव यांनी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत काही वर्ष आपले जीवन जगले. आलेल्या परिस्थितीला हिंम्मतीने समोर जात एक एक दिवस पुढे सरकत असताना आपणही काय तरी करायला हवं असं मनाशी ठाम करून काल (दि.७ जानेवारी २०२४) देवरुख साडवली एम.आय.डी. सी. मध्ये हिरा नावाचे हॉटेल उभे केले.या हॉटेलच्या शुभारंभासाठी खास उपस्थित राहिले ते म्हणजे चिपळूण - संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री.शेखर गोविंदराव निकम, रत्नागिरी जिल्हा रेल्वे अधिकारी संतोष वामन पाटोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मुंबई महेंद्र मनवे, मुंबई पोलीस कु.सिद्धेश जाधव, भाजप कार्यकर्ते राकेश जाधव, राज्याचे मंत्री आमदार उदय सामंत यांचे विश्वासू संगमेश्वर तालुका शिवसेना युवक उपाध्यक्ष सुधीर चाळके, पत्रकार - सौ.मनस्वी मनवे (निकिता राजेंद्र जाधव ), सौ.सायली जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चिपळूण तालुका कोकरे जिल्हा परिषद गट अध्यक्ष संजय कदम, अमित सुर्वे, राजेंद्र कदम, प्रशांत कांबळे तसेच अन्य महिला मंडळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमदार शेखर निकम यांच्या शुभ हस्ते फित कापुन या हॉटेलचा सुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार शेखर निकम साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत करताना हिरा हॉटेलच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांनी रेश्मा जाधव यांचा आदर्श घेऊन वाईट दिवसात खचून न जाता आलेल्या प्रसंगाला तोंड देत जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले तर यश दूर नाही असं मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...