Saturday 20 January 2024

कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ४८ दिवसांपासून काम बंद आंदोलन !!

कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ४८ दिवसांपासून काम बंद आंदोलन !!

*आंदोलनाला निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेचा जाहीर पाठिंबा*

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून सरकार अद्याप त्यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाले आहे.
शनिवारी झालेल्या प्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या हॉलमध्ये कल्याण तालुक्यातील ३५० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

या ठिकाणी सरकार विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या तसेच तीव्र मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे येथील उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक मुखाने निर्धार केला.
कल्याण तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेल्या ४८ दिवसापासून आपल्या विविध मागण्यांकरिता काम बंद आंदोलन पुकारले आहे परंतु या निगरगट्ट सरकारने अद्यापही या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने अंगणवाडी कर्मचारी चांगले संतापले आहेत.

*काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या*

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युइटीचे नियम तात्काळ तयार करा.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अंशदान न देता दरमहा पेन्शन लागू करा.

मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतर करा.

१० वी पास मदत सेविकांना सेविका पदी थेट नियुक्ती करा.
मदत सेविकांमधून मुख्य सेविकेची नियुक्ती करा

या व अशा विविध मागण्यांकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या ४८ दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मात्र सरकार या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने यापुढे कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला असून एक डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यालयावर  तीव्र मोर्चाचे आयोजन केले आहे असे कल्याण तालुका अध्यक्षा स्मिता सरदेशपांडे उपाध्यक्षा शिल्पा बावकर यांनी सांगितले आहे.

या आंदोलनाला जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या आदेशाने कल्याण पश्चिम समन्वयक संदीप शेंडगे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जिजाऊ संस्था सक्रिय सहभाग घेणार असल्याचे शेंडगे यांनी उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगितले.

यावेळी वंदना बागुल, रूपाली पाटील, माया निकम, वंदना गजबे, योगिनी शिंदे, शशिकला मोरे, निकम पाटील, उषा रसाळ यांसह ३५० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी व सदस्य समाजसेवक गौतम मोरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...