Saturday 20 January 2024

कॉग्रेस पक्षाची कोकण विभागीय बैठक बुधवार (दि. २४) रोजी भिवंडीत !

कॉग्रेस पक्षाची कोकण विभागीय बैठक बुधवार (दि. २४) रोजी भिवंडीत !


भिवंडी, नारायण सुरोशी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची कोकण विभागीय पदाधिकारी बैठक बुधवार (ता.२४) रोजी भिवंडीत कल्याण बायपास (रांजनोली) चौकाजवळील हॉटेल वाटिका येथे होत आहे. कॉंग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न होणार आहे.

या बैठकीमध्ये संपूर्ण कोकण विभागातील (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, मावळ, सिंधुदुर्ग) कॉंग्रेस पक्षाचे हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश सचिव कॉंग्रेस कमिटी, माजी उपमहापौर मुंबई महानगरपालिका राजेशजी शर्मा यांनी बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. येथे होणाऱ्या या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याबरोबरच पक्षातील ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे अनेक दिग्गज व जेष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. संबंधित बैठकीमध्ये चेन्नीथला यांच्याकडून शहर, जिल्हा, ग्रामीण स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. यावेळी बूथ कमिट्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेस पक्षाकडेच आहे. त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते बूथ पातळीपर्यंत सर्व स्तरावर कॉंग्रेस पक्षाने तयारी केलेली असून पक्षाचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा दावा जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे  यांनी केला.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...