Saturday, 20 January 2024

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले जयेश ट्रेनिंग क्लासेसचे खेळाडू !

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले जयेश ट्रेनिंग क्लासेसचे खेळाडू !

घाटकोपर (शांताराम गुडेकर) :

            नुकत्याच पार पडलेल्या १२ ते १४ जानेवारी सिंगापूर येथील विन कप ओपन तायक्वांदो आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तनिष्का वेल्हाळ हिने क्युरोगी या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे तसेच पूमसे या प्रकारात ब्लॅक बेल्ट कॅटेगरीमध्ये जगभरातील १९ विद्यार्थी मध्ये कास्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत जगभरातून जवळपास १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच या स्पर्धेमध्ये जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या प्रशिक्षकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. त्यामध्ये सांघिक पूमसे व वैयक्तिक पूमसे  या प्रकारात सहभाग घेऊन विक्रांत देसाई, यश दळवी, स्वप्निल शिंदे, चंदन परिदा यांनी विविध गटात सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेसाठी गेले महिनाभर हे खेळाडू दिवसातून चार तास सराव करत होते आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणून भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे जयेश वेल्हाळ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद? ** सुनील चौधरींच्या युती प्रस्तावाला राजेंद्र वाळेकरांचा विरोध अंबरनाथ, प्रत...