Saturday 20 January 2024

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा व कुणबी समाज महामेळावात पत्रकार वेदिका आलिम यांचा गौरव !!

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा व कुणबी समाज महामेळावात पत्रकार वेदिका आलिम यांचा गौरव !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा व कुणबी समाज महामेळावा आण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती, पुणे, या ठिकाणी हजारो बंधू-भगीनींच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला. अन्याया विरूध्द वाचा फोडणारी संघटना म्हणजे सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) ही संघटना गेली पंधरा वर्षे सातत्याने समाजकार्यात आपला ठसा उमटवत आहे, या संघटनेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा आणि कुणबी समाज महामेळावात मुंबई उपाध्यक्ष ( महिला विभाग -स. कु. सं. पुणे शहर (महाराष्ट्र ) सौ. वेदिका विजय आलिम (पत्रकार /सामाजिक कार्यकर्ती ) यांचा महिला मंडळतर्फे सत्कार करण्यात आला. 

           यावेळी प्रमुख पाहुणे रवींद्रजी धंगेकर (आमदार कसबा मतदार संघ पुणे), अजितजी यशवंतराव -(संचालक-रत्नागिरी जि.मध्यवर्ती सहकारी बँक.), विजयजी उर्फ बापूसाहेब डाकले-अध्यक्ष-आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक स.महाराष्ट्र शासन, डॉ.संदीपजी बुटाला सर, किरणजी दगडे पाटील-नगरसेवक म.न.पा., सचिनजी तावरे-राष्ट्रवादी नेते पर्वती, प्रकाशजी यादव, विकासजी लांबोरे, वासुदेवजी साळवी, चंद्रकांतजी भुवड, मधुकरजी ठीक, विजयजी धामणे, उमेशजी टेमकर, योगेशजी निंबरे, सत्यजितजी हिरवे, तसेच प्रत्येक तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील आदी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. सहयाद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी गणपत दादा घडशी-कार्याध्यक्ष विलास दादा घडशी- अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत, प्रविण भोज, दिपक फणसळकर, विठ्ठल नाईक उपाध्यक्ष महा. प्रांत. सतीश डाकवे-अध्यक्ष पुणे शहर, नितिन शिगवण-अध्यक्ष पुणे जिल्हा, अंकिता शिगवण-महिलाध्यक्षा पुणे शहर, कार्याध्यक्षा-वैष्णवी भोज ,सरचिटणीस वर्षा घडशी, महाराष्ट्र प्रांत कोअर कमिटी पदाधिकारी, युवा नेते सचिन घडशी, माजी अध्यक्ष एकनाथ मांडवकर पुणे शहर सर्व विभाग अध्यक्ष, पदाधिकारी तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी सर्व कार्यकर्त्या उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...