Friday, 9 February 2024

उल्हासनगर शहर वाहतूक उपशाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक स्तरावरील उत्तम कामगिरीबद्दल सत्कार !

उल्हासनगर शहर वाहतूक उपशाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक स्तरावरील उत्तम कामगिरीबद्दल सत्कार !

कल्याण, (संजय कांबळे) : उल्हासनगर वाहतूक उपविभाग हद्दीत सन २०२३ मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालका विरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वे एकूण ६० हजार ४०६ इतक्या केसेस केल्या. मात्र यामध्ये वैयक्तिक स्तरांवर उत्तर कामगिरी करणाऱ्या या शाखेतील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी विशेष बक्षीस देऊन सत्कार केला. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे कर्मचारी व नागरिकांकडून कौतुक होत आहे. 

उल्हासनगर म्हटलं की तूफान वाहतूक कोंडी असे जणू समीकरण बनले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरातील वाहतूक उपशाखा चांगले काम करत आहे, रस्त्यावर अथवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोटारसायकल, रिक्षा अथवा इतर मोठ्या गाड्या वर कारवाई, छोट्या गाड्या टोंईग करणे, दंडात्मक कारवाई, आदी विविध प्रकारच्या कारवाईमुळे उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडी ब-यापैकी कमी झाली आहे. मात्र या कारवाई मुळे अनेक वेळा व्यापारी, वाहनचालक, नागरिक आणि वाहतूक पोलीस यांच्यात वाद, खटके, अथवा काही वेळेस हाणामाऱ्या झाल्याच्या घटना घडल्या होत्या,
परंतु तरीही वाहतूक पोलिसांनी कारवाई थांबवली नाही, सन २०२३ मध्ये या हद्दीत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ६० हजार ४०६ केसेस करुन सुमारे ५ कोटी ३२ लाख ९१ हजार इतका दंड आकारला गेला आहे. यामध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या__

१) पोलीस हवालदार पद्माकर गोंधळी, कामगिरी ५ हजार ४७२ केसेस, दंड ३९ लक्ष २ हजार २०० दंड, 

२) पोलीस नाईक रितेज आरज, कामगिरी, ५ हजार ४७२ केसेस, दंड ३९ लक्ष २ हजार २०० दंड,

३) पोलीस नाईक नाना आव्हाड वैयक्तिक स्तरावरील उत्तम कामगिरी २ हजार ३२९ केसेस तर दंड १८ लक्ष ६९ हजार ६०० रुपये आकारण्यात आले. 

त्याच प्रमाणे लोक अदालत १२५ प्रकरणे दाखल तर ३ लक्ष ४६ हजार रुपये दंड शासन भरणा केला आहे. या कामगिरी साठी शहर वाहतूक शाखा उल्हासनगर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भांमरे यांनी या अंमलदारांना बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. यामुळे या पोलिस कर्मचा-यांचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि वार्डन तसेच नागरिक यांनी अभिनंदन व कौतुक केलं आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...