पालपेणे गावच्या नमनातून तब्बल ४ संकासुरांचा मुंबई रंगमंचावर रंगणार खेळ, रसिकांची होणार विक्रमी गर्दी !!
मुबंई : उदय दणदणे
महाराष्ट्रातील विशेषतः कोकणात जोपासलेली नमन लोककला आज मुंबई/पुणे सारख्या शहरातील नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीत सादरीकरण होताना पाहायला मिळते, जन प्रबोधनाचे साधन असलेली "नमन" ह्या लोककलेकडे आज मनोरंजनाचे मुख्य माध्यम म्हणून पाहिले जाते, रत्नागिरीतील विशेषतः गुहागर तालुक्याला देवखेळयांची फार मोठी परंपरा आहे. त्यात संकासुर व नटवा, कोलीन, पुरुष-पात्रमय पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण होत असलेलं हे नृत्य, गुहागर तालुक्यातील नमन मंडळाचं विशेष आकर्षणाचा भाग असतो. वाडवडिलांकडून प्रवाहित झालेली नमन लोककला गेली ३३ वर्षे कायम जोपासणारे कला, क्रीडा, शैक्षणिक, सामजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले गुहागर तालुक्यातील श्री सन्मित्र लोककला मंडळ (पालपेणे) होय.
गेली २१ वर्षे उपरोक्त मंडळाच्या वतीने मुबंई रंगमंचावर दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करत नमन लोककलेत कालपरत्वे नाविन्यपूर्ण बदल घडवून मुबंई रंगमंचावर या मोसमातील नमन शुभारंभ प्रयोग रविवार दिनांक.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी- १० वा. श्रीछत्रपती शिवाजी मंदिर, दादर (प) मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमातून पारंपारिक गण, सुमधुर संगीत, रंगतदार गाणी, साज शृंगारमय सजलेल्या गवळणींचा नृत्याविष्कार, राधा-कृष्णाची रासलीला सह विजय मांडवकर लिखित /महेश आणि महेंद्र मांडवकर दिग्दर्शित ऐतिहासिक वगनाट्य कलाकृती आत्मसमर्पण सह शिमगोत्सव तसेच देवखेळयांतील पारंपरिक वेशभूषेत, मृदुंगाच्या ठेक्यावर नाचणारे "संकासुर" ह्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे, एकाच वेळी रंगमंचावर तब्बल ४ संकासुर व खेळे ह्या नमन प्रयोगाचे खास आकर्षणाचा भाग तितकंच कुटुंबासमवेत पाहण्यायोग्य हा नमन कार्यक्रम रसिकजनांसाठी पर्वणीय असणार आहे.
उपरोक्त मंडळाचे यशस्वी कलाकार यांच्या अथक परिश्रमातून सादरीकरण होणाऱ्या ह्या नमन प्रयोगाला तमाम कलाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे व अधिक माहितीसाठी : ९००४१९७३७३/ ९९२०५३१७४२/ ९५९४४७६७८०/ ७७५६०३७२८८/ ७२०८८६५६१७ नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन श्री सन्मित्र लोककला मंडळ, पालपेणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment