Friday, 9 February 2024

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारात मोफत संगणक प्रशिक्षण उध्दाटन..

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारात मोफत संगणक प्रशिक्षण उध्दाटन..

वसई , प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथे शिवसेना महिला शहरप्रमुख सौ. रूचिता अमित नाईक यांच्या संकल्पनेतून व स्वदान फांउडेशन यांच्या सहकार्यातुन वसई तालुक्यातील विद्यार्थ्यी व 50 वयोमर्यादा पर्यंत महिला व पुरूषांना मोफत संगणक प्रशिक्षणाचे आज शिवसेना लोकसभा समन्वयक नविनजी दुबे यांच्या हस्ते उध्दघाटन करण्यात आले.

तीन महिन्यांपर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वांनी संगणक साक्षर होऊन आजच्या डिजिटल युगात सक्षम व्हावे याहेतुने सामाजिक कार्य म्हणुन संगणकाचे शिक्षण घेणे आता गरजेचे झाले आहे.

प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र हि देण्यात येणार आहे
विलासजी विचारे हे नेहमीच सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमहत्व राहिले आहे असे प्रतिपादन नवानजी दुबे यांनी काढले व या मोफत संगणक प्रशिक्षणाचे सर्वाणी लाभ घ्यावा असे आवाहन सर्वांना केले.

अंगणवाडीतील लहान मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

याविविध उपक्रमांवेळी उपस्थित असंख्य विद्यार्थ्याना मोफत प्रशिक्षण देणारे राजेश मोरे सर, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शिवसेना शहरप्रमुख आनंद नगरकर, विभागप्रमुख गणेश मुनगेकर विभाग प्रमुख दानिश करारी, विभागप्रमुख जयराम पंडीत महिला आघाडी उप शहर संघटक स्मिता वैद्य, व प्राजक्ता कापसे, आशा आदिवाल, कविता धनगर व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतिच्या नावावर असलेल्या गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत अपयशी, संशयाला ऊत! !!

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतिच्या नावावर असलेल्या गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत अपयशी, संशयाला ऊत! !! ...