Saturday, 10 February 2024

जिल्हा परिषद, रायगड पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळावा !!

जिल्हा परिषद, रायगड पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळावा !!

*पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा*


रायगड, प्रतिनिधी :- जिल्हा परिषद रायगड पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद रायगड येथे दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र पुरस्कृत अस्कॅड (ASCAD) योजनेंतर्गत माहिती प्रशिक्षण व संपर्क घटक योजनेंतर्गत जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास जास्तीत जास्त पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे, आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले  आहे.

या मेळाव्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, प्रादेशिक सहआयुक्त (पशुसंवर्धन) मुंबई विभाग, मुंबई डॉ.प्रशांत कांबळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे  उपस्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यामध्ये पशुधनातील विविध रोग प्रादूर्भाव व त्यांचे  नियंत्रण, पशुधनातील लसीकरणाचे महत्त्व, भारत पशुधन प्रणालीद्वारे पशुधनाची नोंदणी तसेच प्राण्यांपासून माणसांना व माणसांपासून प्राण्यांना होणाऱ्या रोगांबाबत (ZONOTIC DISEASES) प्रामुख्याने बर्ड फ्लू, ग्लॅन्डर्स, रेबीस इत्यादी बाबत जनजागृती तसेच पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...