Saturday, 10 February 2024

शिवसेना (उ.बा.ठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवारातर्फे दहा हजाराची कु.बैजू बीपीन यादव याला शिक्षणासाठी आर्थिक मदत !!

शिवसेना (उ.बा.ठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवारातर्फे दहा हजाराची कु.बैजू बीपीन यादव याला शिक्षणासाठी आर्थिक मदत !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचाराचा वारसा जपत बाळासाहेबांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवारातर्फे सांताक्रुज कलीना येथे सुरक्षा रक्षक मध्ये स्वाभिमानाने काम करणारे बिपीन कुमार यादव यांना मायेची सावली परिवारा मार्फत कु. बैजू बिपीन यादव (इ.५ वी) याची शाळेची फी रोख रक्कम दहा हजार रूपये (१०,०००/-रु.) खासदार श्री.विनाय राऊत साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.मायेची सावली संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, उपाध्यक्ष संजय चव्हाण, विजय सावंत, प्रकाश तोडणकर, सुनील पिपले, अमरीश लोटलीकर, विनायक जाधव, विश्वनाथ जाधव यांच्या सहकार्याने ही वैयक्तिक मदत देण्यात आली. शिवसेना उध्द बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवारातर्फे दहा हजाराची कुमार बैजू बीपी यादव शिक्षणाची आर्थिक मदत देण्यात आल्याबद्दल या परिवाराचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचे आभार व्यक्त करत अनेकांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...